शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

मायणीला पक्षी अभयारण्याचा दर्जाच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 4:51 AM

आश्रयस्थानांच्या संरक्षणाची गरज : मानवी हस्तक्षेपामुळे सातारा जिल्ह्यातील परिसराकडे परदेशी पाहुण्यांची पाठ

प्रगती जाधव-पाटील।

सातारा : मायणीला अभयारण्याचा दर्जा कधी नव्हताच व नाही! त्यामुळे एक वनपाल व एक वनरक्षक जाता-येता मायणी तलावावर लक्ष ठेवून असतात; हेच संरक्षण आणि इतकंच संवर्धन! सातारा जिल्हा प्रशासन (जिल्हाधिकारी कार्यालय) व सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असाच उल्लेख आढळतो. फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारा मायणी परिसर दुर्लक्षितच राहिला. म्हणूनच की काय आज मायणीकडे या परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे.सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) तलाव परिसराचा उल्लेख सर्रास ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असाच केला जातो. मायणीला अभयारण्याचा दर्जा कधीच नव्हता व आजही नाही. ते अभयारण्य असल्याची कोणतीही नोंद अभिलेखावर आढळत नाही, असा खुलासा वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

मायणी येथे चाँद नदीवर तलाव बांधण्यात आला आहे. या ब्रिटिशकालीन तलावामुळे सांगली-सातारा जिल्ह्यांतील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. तलाव परिसराचा कालांतराने मायणी पक्षी अभयारण्य, असा लौकिक झाला. या कथित अभयारण्यास इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आल्याची वदंता आहे. यासंदर्भात सातारा वन विभागाच्या कार्यालयात शोध घेतला असता ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असल्याचे सांगणारा एकही कागदोपत्री पुरावा आढळला नाही. वनपाल व वनरक्षक अशा दोघांच्या भरवशावर सध्या मायणी व परिसरातील शेकडो हेक्टर वनसंपदा आहे.

मायणी तलावातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाबाबत बोलताना साताऱ्यातील वन्यजीवरक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘मायणीत गाळाचे बेसुमार उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षित ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्ष्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली. बेशरम वनस्पती व खोल पाण्यामुळे या पक्ष्यांची अन्नसाखळी धोक्यात आली आहे.’पक्षी सप्ताह विशेष1. अभयारण्याचा कोणताही वैधानिक दर्जा नसल्याने पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या या निसर्गस्थळाचे संवर्धन व संगोपनासाठी शासनाकडून कोणत्याही विशेष निधीची तरतूद नाही, तसेच विशेष लक्षही दिले जात नाही.2. युरेशियन डक, कॉमनकुट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्ष्यांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पाणकावळा, तुतारी, नदीसुरय, कांडे, करकुचे, चक्रवाक, सारंग तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असणारा फ्लेमिंगो (रोहित पक्षी), अशा विविध देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन येथे होत होते. हा संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये मायणी तलावाकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहेमायणी वनक्षेत्र विशेष संरक्षित झाल्यास त्याला शासनाकडून स्वतंत्र निधी, अधिक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. शिवाय मायणी तलाव व परिसराच्या शाश्वत विकासासाठी शासन निर्देश देते. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे हे आश्रयस्थान त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित होईल.- डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, साताराराजे-रजवाड्यांच्या काळात शिकारीसाठी जंगलं राखून ठेवली जायची. पक्ष्यांच्या शिकारीसाठी मायणी हे त्यापैकीच एक राखीव क्षेत्र आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय वन कायदा लागू झाला. त्यानुसार ही सर्वच जंगलं आपोआप संरक्षित झाली. मात्र, मायणीची नाममात्र का होईना अधिसूचना निघाली नाही; जी होणे गरजेचे होते. - अजित (पापा) पाटील, मानद वन्यजीवरक्षक, सांगली

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य