मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वत्र उपाय योजना राबविण्यात येत असतानाच ३१ मार्चपर्यंत मुंबई लॉक डाऊन करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि इतर घटक बंद आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून वांद्रे कुर्ला संकुल आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा चक्क चांगला नोंदविण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठप्प झाली आहे. येथील वाहतूक व्यवस्था बंद आहे. आता तर लोकलदेखील बंद झाली आहे. याशिवाय कारखाने, उद्योग बंद आहे. बांधकामेदेखील बंद आहेत. त्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण कमी आहे. धूर, धुके आणि धूळ यांचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईवरचे धुरके देखील हटले आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईची हवा स्वच्छ नोंदविण्यात येत आहे.
हवेतील प्रदूषक कणांचे प्रमाण पार्टीक्युलेट मॅटरमध्येबोरिवली ६९ समाधानकारकमालाड ७१ समाधानकारकभांडूप ५७ समाधानकारकअंधेरी ७८ समाधानकारकवरळी ८५ समाधानकारकचेंबूर ६७ समाधानकारकबीकेसी ६१ समाधानकारकमाझगाव ५१ समाधानकारककुलाबा ४५ चांगलीनवी मुंबई ९४ समाधानकारक