वने, जलाशये, गवती माळराने व कांदळवने ही विकासाला गती देणारी महत्त्वपूर्ण निसर्गस्रोत आहेत व ती विकासात बाधा तर अजिबात नाहीत, हे सरकार, प्रशासन व नियोजनकर्त्यांनी प्रथम समजून घेतले पाहिजे. हे निसर्गस्रोत कोपले, तर देशाच्या विकासाचे काय होते, हे कोविड ने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे. यासाठी आपणास मृदा व ओलावा संवर्धनाच्या प्रभावी उपाययोजना पाणलोट क्षेत्रनिहाय राबविण्याची गरज आहे. यातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरविला जाईल व दुष्काळ, पूर याद्वारे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. या उपायांनीच भूगर्भातील जलस्तर वाढविणे शक्य होईल.
-बिट्टू सहगल,प्रसिद्ध पर्यावरणवादी व संस्थापक सँक्चुरी नेचर फाऊंडेशन, मुंबई