शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 5:48 PM

bycycle rally Ratnagiri : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरूणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली होती.

ठळक मुद्देयवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीतप्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश

दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरूणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली होती.

प्रणालीने अवघ्या २१ वर्षात समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तिला दोन बहिणीही आहेत. प्रणालीने दापोलीमधील कुडावळे येथे दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी यांच्याकडे काही दिवस वास्तव्य करून निसर्गस्नेही जीवनशैलीबद्दल जाणून घेतले. पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करता कसं छान जगता येतं, हे प्रणाली येथे शिकली. भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून, संयमित, निरामय, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली जगणारे कुटुंब विक्रांत आणि मोहिनी पाटील यांनीही तिचा पाहुणचार केला.प्रणाली काही दिवस चिखलगाव येथील दांडेकर परिवाराकडे पाहुणचार घेत लोकसाधना प्रकल्पाचा अभ्यास करणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगिण ग्रामविकास या पाच क्षेत्रात लोकसाधना आज काम करत आहे. त्यामुळे येथे खूप काही नवीन शिकायला मिळेल असा विश्वास प्रणालीने बोलून दाखविला.

सायकलने प्रवास करीत प्रणाली नागरीकांशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणांना भेटी देऊन जनजागृती करते व माहिती पोचवते. त्या-त्या भागातील माहिती घेते, चर्चा करते. आरोग्य जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते.स्वजबाबदारीवर प्रवासप्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत स्वजबाबदारीचा आहे. ती सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पैसे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत आर्थिक व वस्तूरूपातील मदतसुध्दा लोकच करतात. या सात महिन्यांत अनेक सुखद अनुभव आले आहेत, असे प्रणालीने सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणbycycle rallyसायकल रॅलीRatnagiriरत्नागिरी