शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

आंबोली दोडामार्गमध्ये आढळला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 5:39 PM

Tiger Dodamarg Amboli forest department kolhapur : सिंधुदुर्गातील आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह जंगलक्षेत्रात नर वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळले असून, त्याच्या पावलांच्या ठशावरुन हा पूर्णवाढीचा नर वाघ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच या भागात वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआंबोली-दोडामार्गच्या राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व स्पष्टशिकार केलेल्या गव्याचे आढळले शरीर : पावलांच्या ठशावरुन नर वाघाची शक्यता

संदीप आडनाईककोल्हापूर : सिंधुदुर्गातील आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह जंगलक्षेत्रात नर वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळले असून, त्याच्या पावलांच्या ठशावरुन हा पूर्णवाढीचा नर वाघ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच या भागात वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे.आंबोलीत यापूर्वीही वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवशेष मिळाले होते. लॉकडाऊनमध्येही आंबोली परिसरात वाघाने म्हशीची शिकार केली होती. दोन दिवसांपूर्वी आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाने केलेली गव्याची शिकार आणि वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान वाघाच्या पावलाचे ठसे सापडल्याने आंबोलीपासून आजरा जंगलक्षेत्रात नर वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. बेन क्लेमेंट यांनी सांगितले आहे.

वाघांच्या सलग भ्रमणमार्ग ठरतोय उपयुक्तवन्यजीव मंडळाच्या शिफारशीवरुन डिसेंबर, २०२०मध्ये राज्य सरकारने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या ह्यआंबोली-दोडामार्गह्ण आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील चंदगड तालुक्यातील जंगलक्षेत्र संरक्षित करुन त्याला ह्यकॉन्झर्वेशन रिझर्व्हह्ण म्हणून राखीव केले होते. तसेच याला जोडून असलेल्या २९.५३ चौरस किलोमीटरचे तिलारी जंगलक्षेत्रही राखीव संवर्धन म्हणून संरक्षित केले होते. तीन राज्यांच्या सीमेवरील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पसाठी अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. गोव्यातील म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्रही याला जोडलेले असल्याने वन्यजीवांच्या विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता विशेषत: वाघांच्या प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त ठरला आहे. आता वाघांच्या हालचाली आंंबोली, चंदगड, आजरा, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यापर्यंत आढळण्याची शक्यता आहे.

आंबोली, दोडामार्ग, तिलारी या जंगल क्षेत्राला राखीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे वाघांचा भ्रमणमार्ग संरक्षित झाला तसेच तो सलग जोडला गेल्यामुळे या परिसरात वाघांच्या हालचाली दिसत आहेत. हा चांगला परिणाम या वाघाच्या अस्तित्वामुळे दिसून आला आहे.- डॉ. व्ही. बेन क्लेमेंट,मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर.

टॅग्स :TigerवाघDodamarg police stationदोडामार्ग पोलिस स्टेशनAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर