मुंबई – सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई आणि सरपंच परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र दिन हटके स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं हा अभिनव उपक्रम राज्यभरात राबवणार येणार आहे. झाडं आणि निसर्ग यांच्याबद्दल सयाजी शिंदेंना असलेली संवेदनशीलता आणि आत्मीयता सर्वांनाच ज्ञात आहे.
राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावात लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे. आणि या उपक्रमास महाराष्ट्र भरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच परिषदे व्यतिरिक्त स्थानिक लोकं आणि स्थानिक सामाजिक संस्था ही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत. राष्ट्रांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी राज्यभरात २८,८१३ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतिच्या अखत्यारीत असलेल्या गावांत लोकसहभागातून प्रत्येकी १०० स्वदेशी वाणाच्या झाडांचे रोपण व संगोपन करत एका नव्या अर्थाने राष्ट्रध्वजास सलामी द्यायचा मानस करायचा आहे असं सयाजी शिंदेंनी म्हटलं.
काय आहे या अभियानाचे स्वरूप ◆ १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान , कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त आपल्या क्षमतेनुसार वृक्षांची लागवड करावी. वृक्ष लावताना देशी आणि स्थानीक प्रजातीची असावीत.◆वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व झाडे, स्थानिक पंचायतीने किंवा संस्थांनी आणून लावायची आहेत. ◆ सदर वृक्षारोपन हे गावातील जेष्ठ मंडळी यांच्या देखरेखीखाली, गावातील तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे,शालेय विद्यार्थी यांच्या सहभागातून करून घेणे अपेक्षितआहे.◆ ग्रामपंचायतीने शंभर झाडांची लागवड व जोपासना करण्याचा ठराव आणि सरपंच ग्रामसेवक यांचे सहभागी होत असल्याचे पत्र सहयाद्री देवराईच्या ई-मेलवर पाठवावे.◆आंबा,जांभूळ ,फणस,सीताफळ,बोर,चिकू ,पेरु हयासारखी विविध झाडे विविध संकरित वाणात उपलब्ध आहेत. उपजीविकेसाठी आणि गावाच्या आर्थिक उत्थानासाठी अधिक वाण देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाऊ शकते. ◆ आपल्या वृक्षांची जोपासना पाहून सह्याद्री देवराई, यांचेकडून आपल्या गावाला सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल.◆ जी गावे पाचशे वृक्ष किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष जोपासतील, त्यांना सह्याद्री देवराई च्यावतीने "विशेष गौरव" देऊन सन्मानित करण्यात येईल.◆ उपक्रम राबविण्यास सहयाद्री देवराई कडून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र विभाग पातळी वर समनव्ययक नेमले असून त्यांच्या मार्फत विभागातील सरपंच व स्थानिक लोकांना मार्गदर्शन केले जाते.
विभाग निहाय सहयाद्री देवराई यांचे समन्वयक संपर्क:अमरावती विभाग समाधान लभडे (मो. ९९२०१०९७९९)कोकण विभाग तुषार देसाई (मो. ९१३७४२००२९)नाशिक विभाग निशांत भारद्वाज (मो. ९७०२४९०३८३)औरंगाबाद विभाग योगेश पंदेरे (मो. ८७६७५५८९९५) नागपुर विभाग रतिश रानवडे (मो. ९०२९००२२२३) पुणे विभाग सचिन ठाकूर (मो. ९३७३४२००१८)