शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

World Biodiversity Day : ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या घटना नियंत्रणात येण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:49 AM

ज्ञानगंगा अभयारण्यात लॉकडाउनमुळे उन्हाळ््यात लागणाºया आगींच्या संख्येत घट झाली असून त्यामुळे या जंगलाचे दरवर्षी होणारे मोठे नुकसान टळले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरासह जवळपास चार तालुक्यांसाठी आॅक्सीजन पार्कची भूमिका निभावणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्यात लॉकडाउनमुळे उन्हाळ््यात लागणाºया आगींच्या संख्येत घट झाली असून त्यामुळे या जंगलाचे दरवर्षी होणारे मोठे नुकसान टळले आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील ही वनसंपदा एक प्रकारे रॉ नेजर अर्थात अनडिस्टप फॉरेस्ट म्हणून गणल्या गेल्याने येथे जैविविधतेची भरमार दिसून येत. लॉकडाउनमुळे या अभयारण्यातून जाणारा बुलडाणा-खामगाव मार्गावरील जड वाहतूकही जवळपास बंद झाल्याने जंगलातील वन्य प्राणी हे रस्त्यावरही आता दिवसा बिनदिक्कतपणे फिरत आहे. हा मोठा बदल गेल्या दोन महिन्यात जाणवत आहे. त्यामुळे टीपेश्वरमधून ज्ञानगंगामध्ये आलेल्या टी-वन सी-वनला येथे स्थिरावण्यास मदत मिळाली आहे. हे येथील समृद्ध अन्न साखळीचे द्योतकच मानावे लागेल. जंगलातील वर्दळ कमी झाल्यामुळे उन्हाळ््यातील आगींच्याही घटनांमध्ये घट झाली आहे. प्रादेशिक वनविभागाने तर यंदा आग लागण्याच्या कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी टास्क फोर्स तयरा केला आहे. ज्ञानगंगामध्ये उन्हाळ््यात बहावा, पळस, मोह, मुरड शेंग, बेहडा, कवच बीच यासह आयुर्वेदात उल्लेख असलेल्या अन्य औषधी वनस्पतींची भरमार फुलपाखरांचेही येथे जवळपास २८ पेक्षा अधिक प्रकार आढळून येतात. ग्रास येलो, ड्रॅगन प्लाय, पॅन्सी अशी फुलपाखरे व किटक आहेत.‘रॉ’ नेचरमुळे जैवविविधता समृद्धरॉ नेचर आणि औद्योगिकी करणामुळे जंगलामध्ये होणार हस्तक्षेप बुलडाणा जिल्ह्यात अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे समृद्ध जैवविविधता आहे. भौतिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या बुलडाणा जिल्हा हा डी प्लस मध्ये असला तरी समृद्ध जैविविधतेच बुलडाणा जिल्ह्याचा वरचा क्रमांक आहे.बुलडाणा जिल्ह्यात अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार पक्षी अभयारण्य असे तीन अभयारण्य आहेत. अंबाबरवामध्ये दोन वाघ असून यवतमाळातील टीपेश्वरमधील टी-वन सी-वन ज्ञानगंगात वास्तव्याला आहे. तर लोणार सरोवर हे राज्यातील छोट्या पक्षी अभयारण्यापैकी एक आहे. त्यामुळे येथे जैवविविधतेची भरमार आहे. लॉकडाउनमुळे ज्ञानंगगासह अंबाबरवा अभयारण्यात वन्य प्राण्यांची अन्न साखळी विकसीत होण्यास मदत झाली आहे.

वन समृद्धीसाठी उपयुक्तउन्हाळ््यात प्रादेशिक व वन्यजीव अंतर्गत येणाºया जंगलामध्ये दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी आगी लागल्यामुळे वनसंवर्धनास मदत होत असून प्रामुख्याने पवण्या गवत, घाणेरी, चोरबोर, गुंजाचा पाला या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला नाही. वनसमृद्धीसह जैविविधता निर्मितीसाठी ही बाब दिलासादायक म्हणावी लागले. त्यामुळे प्राण्यांनाही त्याचा लाभ झाल्याचे एकंदरीत चित्र आहे.ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाºया रस्त्यावरील जड वाहतूक बंद झाल्याचा प्राण्यांच्या व जंगलाच्या समृद्धीसाठी फायदा होत असले तर बोथा रस्ता कायमस्वरुपी उंद्रीकडून वळविल्यास जैविविधता समृद्ध होण्यास मदत होवून आग लागणे व अन्य गैरप्रकार टळतील.-प्रा. अलोक शेवडे, जिल्हा जैवविविधता समिती सदस्य किटक अभ्यासक, बुलडाणा

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य