- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विकासाच्या वाटेवर धावतांना शाश्वत विकासाला प्राधान्य न दिल्याने वृक्षतोड वाढून वनाच्छादीत प्रदेश जिल्ह्यात कमी असून त्याचे आता प्रत्यक्ष दृष्यपरिणाम समोर येत आहे. कडूलिंबाच्या आणि वड, पिंपळांच्या दाट गर्द झाडीत लपलेले बुलडाणा शहर आज सिमेंट काँक्रीटचे जंगल बनू पाहत आहे.९० च्या दशकात प्रत्येक घरासमोर असलेले मेहंदीचे कुंपन, सर्वत्र दिसणारी हिरवळ आज नसल्यागत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांचीही अशीच स्थिती आहे. ग्लोबल वार्मिंकचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. १९८५ दरम्यान, किरकोळ स्वरुपात होणारी गारपीट आज तीव्र स्वरुपात झाली आहे. मार्च महिन्यात कधी बुलडाणा जिल्ह्याने रेनी डे पाहिला नव्हता. मात्र आता मार्च एप्रिलमध्ये पाऊस पडत असल्याचे सर्रास चित्र दिसते. अवकाळी पाऊस ही अधिक होत असून तो मोठे नुकसान करणारा ठरत आहे.पावसाळ््यात पडणारा पाऊस हा एकदमच पडत असून अपघाव पद्धतीने पडणारा हा पाऊस शेत जमीनीचीही मोठी हानी करत आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात २००३ पासून एक वर्ष सरासरी पाऊस तर पुढील तीन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस असे चित्र दिसत आहे. त्यातून दुष्काळाची तीव्रता, पाणीटंचाई व नागरी समस्या उद्भवत आहे. नदी नाल्यांमध्ये शहरी भागात अतिक्रमण झाल्याने आपत्तीची व्याप्तीही वाढत आहे. आॅक्टोबर, डिसेंबर पर्यंत पूर्वी वाहनाऱ्या नद्या आता तर अगदी आॅक्टोबरमध्येच आटत आहे.जिल्ह्यातील शेत जमिनीमध्येही पेस्टीसाईडचे प्रमाण वाढले असून २४ गावात ते आढळून आले आहे. पूर्वी जवळपास ७२ दिवस पडणारा पाऊस आताशा अवघ्या ४२ दिवसांवर आला आहे. त्यातही तो ओढ देत असल्याने पीक पद्धतीतही आता काही प्रमाणात बदल होत आहेत.
बुलडाणा शहराचे वैभव असलेल्या राजूर घाटातील वनसंपदा वृक्षतोडीने विरळ झाली. विकासाच्या नावाखाली शाश्वत विकासाला आपण दूर सारत आहोत. त्यामुळे बुलडाणा हे थंड हवेचे वाळवंट होण्याची भीती आहे.-प्रा. अलोक शेवडेजैवविविधता समिती सदस्य, बुलडाणा