लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समतोल निसर्गचक्रावरच आपले अस्तित्व असल्याच्या जाणीवेचा मानवाला विसर पडत चालल्याने पर्यावरणाचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी घेत आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला. मात्र, असे करताना त्याचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याने ध्वनी, जल व वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली.प्राचीन काळी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणाऱ्या मानवाने आता सदर चौकटी उद्ध्वस्त करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. निसर्गावर नानाविध प्रयोग करीत वर्तमानाशी जुळवून घेताना त्याचे भविष्याकडे पार दुर्लक्ष होत गेले आणि येथूनच खºया अर्थाने पर्यावरण ºहासाची प्रक्रिया सुरू झाली. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. वाशिम जिल्ह्यातील पर्यावरणाचा विचार करता जिल्ह्यात वायू आणि ध्वनी प्रदुषणात फारसी वाढ झाली नाही. कारण जिल्ह्यात औद्यगिकरण वाढलेले नाही. डिजेचा वापर वाढला असला तरी, ते प्रमाणही फारसे नाही. प्रामुख्याने जलप्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. कृषीपद्धतीमधील बदलाने रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर वाढला. त्यामुळे जमिनीतील कर्ब कमी झालेच शिवाय रासायनिक घटक नदी नाल्यांत मिसळू लागल्याने नद्या प्रदुषीत झाल्या. घरात वापरले जाणाºया काही पदार्थांमधील विषारी घटकही सांडपाण्यात मिसळून नदी, नाल्याद्वारे प्रकल्पांत जाऊ लागले. शिवाय हेच पाणी जमिनीत झिरपूर विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्यातही मिसळू लागल्याने पिण्याच्या पाण्यात आरोग्यास हानीकारक घटकांचे प्रमाण वाढल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरून दरवर्षी सिद्ध होत आहे.सन 2000 ची स्थिती1. २००० मध्ये नद्यांची स्थिती चांगली होती. त्यामुळे विविध जलचरांची संख्या लक्षणीय असल्याने जलप्रदुषणावर प्रभावी नियंत्रण मिळत होते.2. २००० पर्यंत वाशिम जिल्ह्यात पारंपरिक आणि सेंद्रीय शेतीचे प्रमाण अधिक होते. पूर्वी सेंद्रीय खतांचा वापर अधिक व्हायचा3. २००० मध्ये जंगलाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे उष्णता जाणवत नव्हती. उष्ण लहरी कमी होत्या4. २००० मध्ये वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे ध्वनी प्रदुषण आणि वायू प्रदुषण नियंत्रित होते.5. जिल्ह्याची भुजल पातळी नियंत्रित होती. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रमाण कमी होते.सध्याची स्थिती1. गेल्या २० वर्षात नद्यांमधील अधिवास संपले, नदीकाठचा झाडोरा नष्ट झाल्याने जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले.2. २०२० मध्ये शेतीत रासायनिक खते आणि औषधांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विषारी द्रव्ये वाहून जलस्त्रोतात मिसळत आहेत.3. २०२० पर्यंत वनपरिक्षेत्र घटले व महामार्गांसाठी झाडांची कत्तलही झाली. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली आणि उष्ण लहरी वाढल्या4. २०२० मध्ये वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे ध्वनी प्रदुषण काही प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.5. आता भुगर्भातील पाण्याचा वापर वारेमाप वाढला आणि पावसाची अनियमिता वाढल्याने भुजल पातळी १ मिटरपर्यंत खालावली.जिल्ह्यात काही ठिकाणी वृृक्षतोड होत असल्याने जंगल विरळ होत असल्याचे दिसून येते तर दुसरीकडे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत असल्याने शहरासह ्रग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाचे काम होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील नदी, नाल्यांमध्ये जलप्रदुषण आहे. -अभिजित जोशीपर्यावरण तज्ज्ञ, वाशिमजिल्ह्यात ध्वनी, वायू प्रदुषणात फारसी वाढ झाली नाही; परंतु शेती पद्धतीमधील बदलामुळे रासायनिक द्रव्यांचा वापर वाढल्याने ही द्रव्ये नदी, नाल्यांसह जमिनीत झीरपून विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यात मिसळत असल्याने प्रामुख्याने जलप्रदुषण वाढले आहे. -डॉ. निलेश हेडा,पर्यावरण तज्ज्ञ, तथा जलअभ्यासक