Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 05:31 PM2024-06-13T17:31:00+5:302024-06-13T17:42:43+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या २०%, ११० मुस्लिम खासदार निवडून आले आहेत असा दावा केला जात आहे. पण हा दावा खोटा आहे.

110 muslim mps elected to lok sabha Election result 2024 | Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा

Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा

Claim Review : लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या २०%, ११० मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. 
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: News Checker
Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या २०%, ११० मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. 

ट्विटचं अर्काइव्ह येथे पाहता येईल.

Fact

न्यूजचेकरने “मुस्लिम खासदार लोकसभा”साठी कीवर्ड शोधला. ज्यामुळे आम्हाला अनेक बातम्या मिळाल्या ज्यामध्ये यावर्षी फक्त २४ मुस्लिम लोकसभेवर निवडून आले, २०१९ पेक्षा दोन कमी आहेत असं समजलं. रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये लढलेल्या ११५ मुस्लिम उमेदवारांच्या तुलनेत या निवडणुकीत ७८ मुस्लिमांनी निवडणूक लढवली यामध्ये अपक्षांचाही समावेश आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण भारतात ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा कोणताही रिपोर्ट आम्हाला आढळला नाही.

"लोकसभेच्या एकूण संख्याबळात आता मुस्लिमांचा वाटा फक्त ४.४२% आहे. १९८० मध्ये विक्रमी ४९ मुस्लिम खासदार (सभागृहाचे ९.४%) निवडून आले आणि १९८४ मध्ये ४५ मुस्लिम खासदार (सभागृहाचे ८.३%) निवडून आल्यावर लोकसभेतील मुस्लिमांची संख्या कधीही 40 च्या वर गेली नाही" असं ८ जून २०२४ रोजीचा Indian Express चा रिपोर्ट सांगतो. एबीपी न्यूजचा रिपोर्ट येथे पाहता येईल.

"NDA पक्षांमध्ये एकही मुस्लिम खासदार नसताना, INDIA आघाडीत ७.९ टक्के मुस्लिम खासदार आहेत. त्याचप्रमाणे, NDA कडे एकही ख्रिश्चन खासदार नाही, तर INDIA आघाडीमध्ये ३.५ टक्के ख्रिश्चन खासदार आहेत. NDA मध्ये एकही शीख खासदार नाही तर INDIA आघाडीमध्ये शीख समुदायाचे पाच टक्के खासदार आहेत. एकूणच, यावेळी २४ मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत" असं ७ जून २०२४ रोजीचा मिंटचा रिपोर्ट सांगतो. असाच एक Print चा रिपोर्ट येथे पाहता येईल, जो दावा केल्याप्रमाणे ११० नव्हे तर २४ मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले याची पुष्टी करतो.

Source
Indian Express report, June 8, 2024
ABP News report, June 5, 2024

(सदर फॅक्ट चेक  News Checker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: 110 muslim mps elected to lok sabha Election result 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.