गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ५०० च्या नोटांवरील नंबरमध्ये स्टार (*) चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. खरोखरच या नोटा खोट्या आहेत का? काही वर्षांपूर्वी १० रुपयांचे कॉईनही खोटे असल्याचे समजून लोक घेत नव्हते. आता ५०० रुपयांच्या नोटांवरून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. परंतू हा दावाच खोटा आहे, तर नोटा खऱ्या आहेत.
खरेतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे डिसेंबर 2016 पासून नवीन 500 रुपयांच्या बँक नोटांमध्ये स्टार चिन्ह देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे तारा चिन्ह असलेली नोट असेल तर घाबरू नका. कारण ती खोटी नाहीय. ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
''गेल्या 2-3 दिवसांपासून (*) चिन्ह असलेल्या या 500 च्या नोटा बाजारात धावू लागल्या आहेत. अशी नोट काल इंडसइंड बँकेतून परत करण्यात आली. ही बनावट नोट आहे. आजही एका मित्राला एका ग्राहकाकडून अशा २-३ नोटा मिळाल्या, पण लक्ष दिल्याने त्याने लगेच त्या परत केल्या.'', असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
'पीआयबी फॅक्ट चेक' ने याबाबत खुलासा केला आहे. तुमच्याकडे स्टार (*) असलेली नोट आहे का? ती खोटी आहे का?घाबरू नका!! अशा नोटा खोट्या असल्याचा संदेश जात आहे. आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने डिसेंबर 2016 पासून नवीन 500 रुपयांच्या बँक नोटांमध्ये स्टार चिन्ह (*) लागू केले होते, असे यात म्हटले आहे.