Created By: PTI News
Translated By: ऑनलाइन लोकमत
गेल्या काही दिवसापासून देशभरात संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.विरोधी पक्षातील खासदारांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बाकावर ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.
पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले. तपासात हा फोटो राज्यसभेचा नसून कर्नाटकातील बेळगावी येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
दावा-
१९ डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'लव दत्ता INC' नावाचा वापरकर्त्याने एक फोटो शेअर केला आहे. यासह लिहिले की, "राज्यसभेत विरोधी पक्षाच्या बाकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, जय भीम"
या पोस्टला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्ते हे चित्र अशाच दाव्यासह शेअर करत आहेत. पोस्टची लिंक, संग्रहण लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.
इतर अनेक वापरकर्ते देखील याच दाव्यासह हा फोटो शेअर करत आहेत, जे येथे आणि येथे क्लिक करून पाहिले जाऊ शकतात.
तपास-
व्हायरल फोटोला 'रिव्हर्स सर्च' केल्यावर, 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वेबसाईटवर १९ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित झालेली बातमी आम्हाला आढळली. कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो ठेवण्यात आली होती. या बातमीत एक व्हायरल फोटो देखील समाविष्ट करण्यात आले होते. येथे क्लिक करून संपूर्ण अहवाल वाचा.
तपासादरम्यान, आम्हाला हा फोटो काँग्रेस पक्ष आणि कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत 'एक्स' खात्यावर देखील आढळला. १९ डिसेंबर रोजी त्यांनी कर्नाटक विधानसभेचा हा फोटो शेअर केला होता. पोस्टची लिंक पहा येथे आणि येथे क्लिक करा.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केला आणि त्यांचे कर्नाटक असे वर्णन केले. पोस्टची लिंक येथे पहा.
आमच्या आतापर्यंतच्या तपासावरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला फोटो राज्यसभेचा नसून कर्नाटक विधानसभेचा आहे. युजर्स हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत खोटे दावे करत आहेत.
दावा-
" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या बाकावरचा फोटो. जय भीम."
वस्तुस्थिती-
पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने केलेल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा ठरला आहे.
निष्कर्ष-
व्हायरल झालेला फोटो राज्यसभेचा नसून कर्नाटक विधानसभेचा आहे. युजर्स हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत खोटे दावे करत आहेत.
(सदर फॅक्ट चेक PTI News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)