नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये निर्बंध लागू करावे लागले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनंतर आता ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्धांचं लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय ४५ ते ६० वर्षे वयोगटातल्या गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे. नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. (PIB Fact Check on Corona Vaccine)हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !कोरोना लसीमुळे कोणाकोणाला कोणकोणता धोका आहे याबद्दलचा एक मेसेज सध्या व्हायरल झाला आहे. मधुमेही, महिला, मद्यपान, धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना लस घेतल्यास गंभीर आजार होऊ शकतात. जीवालादेखील धोका होऊ शकतो, असे दावे मेसेजमध्ये करण्यात आले आहेत.कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आमचा नंबर केव्हा लागणार ?
व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय?– अविवाहित मुलींनी लसी देऊ नका. लग्नानंतर मुलं होऊ शकणार नाहीत.– मुलांना लसीकरणापासून दूर ठेवा. भविष्यात अनेक आजार होऊ शकतात.– न्यूमोनिया, अस्थमासारखे श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी लस घेऊ नये. साईड इफेक्टमुळे मृत्यूचा धोका.– मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांनी, तंबाखूचं सेवन करणाऱ्यांनी लस घेऊ नये. कर्करोग होण्याची शक्यता– मानसिक आणि न्यूरल आजार असलेल्या रुग्णांना लस घेऊ नये. आजार बळावण्याची शक्यता– मधुमेह किंवा कर्करोगाच्या रुग्णांनी लस घेऊ नये. हलक्या साईड इफेक्टमुळे मृत्यू होऊ शकतो.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या मेसेजमधील माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं पीआयबीनं फॅक्टचेकच्या (PIB FactCheck) माध्यमातून सांगितलं आहे. कोविडवरील लस घेतल्यास पुरुष किंवा स्त्रियांमधील संतती होण्याची क्षमता संपत असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत. मधुमेह किंवा कर्करोगाचा सामना करणाऱ्यांनी लस घेणं गरजेचं आहे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी लसीकरण करून घेणं आवश्यक असल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनदेखील करण्यात आलं आहे.