Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:51 PM2024-06-11T18:51:58+5:302024-06-11T18:52:37+5:30

लोकसभा निवडणूक निकालानंतर ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

Fact Check: Did Rahul Gandhi see Narendra Modi oath in the car? Know the truth behind the viral video | Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

Claim Review : कारमध्ये बसून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: लॉजिकली फैक्ट्स
Translated By: ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली - ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हायरल व्हिडिओत ज्या कारमध्ये राहुल गांधी बसलेत, त्याच्या सीटवर लावलेल्या स्क्रीनवर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताना दिसत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिलंय की, आज संध्याकाळचं सर्वात सुंदर दृश्य, खटा खटा खटा खट शपथविधी पाहणार, हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ३१ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

या पोस्टची अर्काइव लिंक यावर क्लिक करून पाहा, आणखी लिंक पाहा

परंतु या व्हिडिओत कारच्या स्क्रीनवर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेताना दाखवले आहे हे फुटेज एडिट करून जोडलेले आहे. मूळ व्हिडिओत स्क्रीन बंद आहे आणि राहुल गांधी खिडकीच्या बाहेर पाहत आहेत. 

सत्य कसं पडताळलं?

व्हायरल व्हिडिओ नीट पाहिला तर त्यात राहुल गांधी यांच्या समोरील स्क्रीनमध्ये दाखवणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथ घेणारा फोटो हा २०१९ च्या शपथविधी सोहळ्यातील आहे. 

हिंदुस्तान टाईम्सच्या युट्यूब चॅनेलवर ३० मे २०१९ रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओत(अर्काइव लिंक) २२ सेकंदावर नरेंद्र मोदी शपथ घेताना त्याच स्थितीत उभे असल्याचं दिसून येते. या काळात नरेंद्र मोदींचा शपथ घेतानाचा आवाजही ऐकायला मिळतो. ज्याला व्हायरल व्हिडिओशी जोडलेले आहे. 

नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या शपथविधी सोहळ्यात हलक्या तपकिरी रंगाचे जाकीट घातलेले दिसते. तर ९ जून २०२४ रोजी आयोजित शपथविधीत त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. 

राहुल गांधी यांच्या व्हिडिओत काय आहे?

आम्ही व्हिडिओशी संबंधित की वर्ड शोधले. त्यात आम्हाला एक व्हिडिओ एप्रिल १७, २०२४ ला राहुल गांधी यांच्या इन्स्टाग्रामवर दिसला. (अर्काइव लिंक) राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, भारत की सोच मै, भारत की खौज मै...हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवरील पेजवरही पोस्ट करण्यात आला आहे. (अर्काइव लिंक)

व्हिडिओत स्पष्टपणे दिसू शकते की, कारमध्ये बसलेले राहुल गांधी यांच्या समोरील स्क्रीन बंद आहे. त्यात काळी स्क्रीन दिसून येते त्याशिवाय काही नाही. 

निष्कर्ष - व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा व्हिडिओ एडिट करून चुकीच्या दाव्यानुसार शेअर केला जात आहे. ज्यावर ते कारमध्ये बसून पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी पाहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

(सदर फॅक्ट चेक या लॉजिकली फैक्ट्स वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: Did Rahul Gandhi see Narendra Modi oath in the car? Know the truth behind the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.