शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 1:02 PM

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Claim Review : ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी मतदानापूर्वीच आपला पराभव स्वीकारला.
Claimed By : Facebook And X Users
Fact Check : चूक

Created By: BoomTranslated By: ऑनलाइन लोकमत

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही दिवसापासून ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओत, लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच त्यांनी आपला पराभव स्वीकारला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बुमला ला हा दावा दिशाभूल करणारा वाटला. व्हायरल व्हिडीओ मूळ संदर्भ सोडून शेअर केला जात आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये मनोज तिवारी २००९ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याबाबत सांगत होते आणि त्यांना पराभवाची भावना असल्याचे सांगत होते. २००९ मध्ये मनोज तिवारी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. 

या ११ सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी "मला माझ्या पराभवाची जाणीव झाली आहे. दुःख गोष्टीचं वाटत आहे की, मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि आता हा पराभव स्वीकारला आहे." 

हा एडीट केलेला व्हिडीओ शेअर करताना सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका यूजरने लिहिले की, 'रिंकियाच्या वडिलांनी आपला पराभव स्वीकारला आहे. आता त्यांच्या समर्थकांनी शांत बसून त्यांची गाणी ऐकावीत.

पोस्टची आर्काइव लिंक

फॅक्ट चेक-

व्हायरल व्हिडिओमध्ये न्यूज आउटलेट जिस्टचा लोगो होता. व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही जिस्टच्या अधिकृत YouTube चॅनेलवर गेलो. तेथे आम्हाला ३१ मार्च २०२४ रोजी अपलोड केलेला मूळ व्हिडीओ सापडला.

एक तास १० मिनिटांच्या या मूळ व्हिडिओमध्ये २७ मिनिटांनंतर पत्रकार त्यांना गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा किस्सा विचारतो. आपल्या आयुष्यातील हा एक रंजक प्रसंग असल्याचे सांगताना मनोज तिवारी म्हणतात, "अमर सिंह जी यांनी यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. २००९ च्या निवडणुकीपूर्वी, अमिताभ बच्चन यांच्या घरी यासाठी एक बैठक झाली होती, यामध्ये अनिल अंबानी देखील उपस्थित होते. निवडणूक लढवायची इच्छा नव्हती पण ठामपणे नाही म्हणू शकलो नाही.

"निवडणूक लढवायची नव्हती कारण योगी आदित्यनाथ यांचे समर्थक होतो आणि विद्यार्थीदशेत  ABVP कार्यकर्ताही होतो, असंही ते म्हणाले. ही संपूर्ण घटना सांगताना मनोज तिवारी ३४ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये म्हणतात, "निवडणुका संपल्याबरोबर आम्हाला आमचा पराभव समजला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि हा पराभव झाला"

संपूर्ण व्हिडीओ पाहून हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडीओ फक्त अपूर्णच नाही तर त्यात काही कटही आहेत, त्यात मनोज तिवारी यांच्या संभाषणातील 'था' हा शब्द भ्रामक दावा करण्याच्या उद्देशाने कापण्यात आला आहे. ते सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पराभवाचा उल्लेख करत नव्हते तर २००९ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढलेल्या निवडणुकीच्या संदर्भात ते बोलत होते. 

यासाठी आम्ही मुलाखत घेत असलेले पत्रकार अनिल शारदा यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी बूमला सांगितले की, "२००९ मध्ये जेव्हा सपा विरुद्ध योगी आदित्यनाथ यांच्यात लढण्याची चर्चा होती, तेव्हा ते म्हणाले होते की मला माझ्या पराभवाची जाणीव झाली आहे." 

२००९ मध्ये मनोज तिवारी यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी ते भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांच्याकडून निवडणूक हरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाdelhiदिल्ली