Created By: the quintTranslated By: ऑनलाईन लोकमत
सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एका मुलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये मुलगी पापाराझींना पोज देताना दिसत आहे.
महाकुंभमध्ये व्हायरल झालेली सुंदर डोळ्यांची १६ वर्षीय मुलगी मोनालिसा भोसलेचे हे दोन्ही व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे.
(सोर्स - एक्स / स्क्रीनशॉट)
(अशाच दाव्यांचे संग्रह येथे आणि येथे पाहू शकता.)
काय आहे सत्य?
एआयच्या मदतीने फेस स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हे दोन्ही व्हिडीओ तयारकरण्यात आले आहेत. मोनालिसाचे हे व्हिडीओ नाहीत.
कसं समजलं सत्य?
आम्ही सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओच्या काही कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले आणि २८ जानेवारी २०२५ रोजी शेअर केलेली एक इन्स्टाग्राम पोस्ट सापडली.
'@ni8.आऊट ९' या युजरने हाच व्हिडिओ शेअर केला असून त्याने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे की, फेस स्वॅप एआय फीचरचा वापर करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे आणि डिजिटल पद्धतीने बदलण्यात आला आहे.
या अकाऊंटवरील सर्व ५३८ पोस्ट अप्रामाणिक होत्या आणि महिलांच्या खऱ्या दृश्यांमध्ये फेरफार करून तयार करण्यात आल्या होत्या.
मोनालिसाची ५० हून अधिक बदललेली दृश्ये या अकाऊंटमध्ये होती आणि त्या सर्वांनी फेस स्वॅप तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
(सोर्स - आयजी / स्क्रीनशॉट)
दुसऱ्या व्हिडिओसाठी आम्ही पापाराझी चॅनल्सची इन्स्टाग्राम पेजेस तपासली आणि १६ जानेवारी २०२४ रोजी 'बॉलीवूडक्रॉनिकल'ने शेअर केलेलं मूळ व्हर्जन सापडलं.
मूळ व्हिडिओमध्ये मोनालिसा भोसले नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री वामिका गब्बी दिसत आहे.
एआय-डिटेक्शन टूल्स
बंगळुरूतील स्टार्टअप कॉन्ट्रेल्स डॉट एआयच्या एआय-जनरेटेड कंटेंट डिटेक्शन टूल्सच्या माध्यमातून आम्ही व्हिडीओ चालवले.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मोनालिसा नाचतानाच्या पहिल्या क्लिपसाठी त्यांच्या रिपोर्टमध्ये ही क्लिप बनावट असल्याचा मध्यम विश्वास दाखवण्यात आला होता.
कॉन्ट्रेल्सला व्हिडिओमध्ये हेराफेरी आढळली.
(स्त्रोत : Contrails.ai/Screenshot)
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, व्हिडिओमध्ये त्याच्या फ्रेमवर "फेस स्वॅप बेस्ड एआय मॅनिपुलेशन" वापरण्यात आलं होतं.
फेस स्वॅपिंग टेक्नॉलॉजीच्या वापराचा उल्लेख करत दुसऱ्या क्लिपसाठीही असंच विश्लेषण करण्यात आलं आहे.
कॉन्ट्रेल्स डॉट एआयचा अहवाल.
(सोर्स - Contrails.ai/Screenshot)
निष्कर्ष
सोशल मीडियावर मोनालिसा भोसलेचा 'नवा मॉडर्न लूक' दाखवत असल्याचा दावा करणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
(सदर फॅक्ट चेक the quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)