Fact Check: व्हायरल फोटोत महेंद्रसिंग धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:28 AM2024-04-23T10:28:12+5:302024-04-23T10:30:57+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अनेक सेलिब्रिटींनी मतदान केल्याचे फोटो पोस्ट केले.
Created By: बूम
Translated By : ऑनलाइन लोकमत
Fact Check, MS Dhoni Viral Photo: सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून त्यात महाराष्ट्रातीलही पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या नंतर अनेक सेलिब्रिटींनी आपण मतदान केले असल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्यातच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून, त्याने काँग्रेस पक्षाला मतदान केल्याचा दावा काही सोशल मीडिया युजर्स कडून केला जात आहे. जाणून घेऊया या मागचे सत्य...
सध्या आयपीएलच्या हंगाम सुरू आहे. सर्वच संघ आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. तशातच धोनीचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या फोटोमध्ये धोनी मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोत धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीमध्ये दिसत आहे. धोनी उजव्या हाताने हाताचा पंजा तर डाव्या हाताने एक आकडा दाखवल्यासारखे हावभाव करत असल्याचा फोटो शेअर करत काही युजर्सने असा दावा केला आहे की, धोनीने काँग्रेसला मतदान केले आहे. पण हा फोटो 2020 सालचा असल्याचे 'बूम'च्या सत्य पडताळणी मध्ये समोर आले आहे.
'बूम'ने केलेल्या सत्य पडताळणीतून समोर आले आहे की धोनीचा हा फोटो 2020 साली पोस्ट करण्यात आला होता. जेव्हा चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर ६ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन केले होते, त्यावेळचा हा फोटो आहे. पण वादग्रस्त ट्वीट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कमाल आर खान याने धोनीचा हा फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले आहे की, 'धोनी स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे की त्याने काँग्रेसला मत दिले आहे, विषय संपला!'
(फेसबुक लिंक / अर्काइव्ह लिंक)
ट्विटरच्या दुसऱ्या एका व्हेरिफाइड युजरने हिंदीत कॅप्शन लिहिले आहे की, धोनी मतदान केल्यानंतर हाताचा पंजा का दाखवत आहे? (धोनी वोट देने के बाद पंजा क्यों दिखा रहे?)
(फेसबुक लिंक / अर्काइव्ह लिंक)
सत्य पडताळणी
'बूम'ने या फोटोमागचे सत्य तपासून पाहण्यासाठी 'रिव्हर्स इमेज सर्च'चा आधार घेतला. यामध्ये एक बाब समोर आली की, अनेक प्रसारमाध्यमांनी ५ ऑक्टोबर २०२० या दिवशी धोनीचा हा फोटो असलेल्या बातम्या दिल्या होत्या.
प्रसारमाध्यमांनी या फोटोबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या की, CSKने ट्विटरवर सहा मिलियनचा टप्पा ओलांडल्यानंतर धोनी आणि त्याचे संघातील सहकारी या गोष्टीचा आनंद साजरा करत आहेत. हा फोटो CSKने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ५ ऑक्टोबर २०२० या दिवशी शेअर केला होता. चेन्नईच्या IPL फ्रँचायजीने हा फोटो पोस्ट करत त्यावर स्थानिक भाषेत लिहिले होते- "Nandri filled Thala Dharisanam as our Twitter fam becomes 6 Million Strong!"
Nandri filled Thala Dharisanam as our Twitter fam becomes 6 Million Strong! #SixerOnTwitter#WhistlePodu#Yellove 🦁💛 pic.twitter.com/GJc6vBYf39
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 5, 2020
पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याशिवाय, 5 ऑक्टोबर 2020 रोजी CSK द्वारे पोस्ट केलेला आणखी एक व्हिडिओही दिसला, ज्यामध्ये फ्रँचायझीमधील इतर क्रिकेटपटू सामील होऊन मैलाचा दगड गाठल्याचा आनंद साजरा करत आहेत. व्हिडिओसह कॅप्शन असे लिहिले आहे की, "ट्विटरवर चेन्नईचा सुपर सिक्सर! गेल्या दशकभरातील प्रत्येक शुभेच्छा आणि सदिच्छांसाठी सर्व सुपर चाहत्यांचे खूप खूप आभार. तुम्हाला शुभेच्छा."
Chennai Super #SixerOnTwitter! A big thanks to all the super fans for each and every bouquet and brickbat throughout the last decade. All the #yellove to you. #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/9KgCtf3G9I
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 5, 2020
पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष- व्हायरल होणारा फोटो हा धोनीचा असला तरी त्यासोबत करण्यात येणारा दावा चुकीचा आहे. धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करत असल्याचा दावा खोटा आहे.
(सदर फॅक्ट चेक 'बूम' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)