Created By: The QuintTranslated By: ऑनलाइन लोकमत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवी नोट जारी करणार आहे, असा दावा करणारा ५००० रुपयांच्या नोटेचा फोटो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जात आहे.
(Source: Facebook/Screenshot)
फेसबुक आणि थ्रेड्स सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. (अशा दाव्यांचे आर्काइव्ह येथे, येथे आणि येथे पाहू शकता.)
सत्य काय आहे?
RBI ५००० रुपयांच्या नोटांची सीरिज जारी करत आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या तथ्य-तपासणी शाखेने स्पष्ट केलं की, व्हायरल दावा खोटा आहे आणि अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर कोणतीही माहिती नाही : आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकात, देशाच्या सेंट्रल बँकेने २००० रुपयांच्या नोटा काढण्याच्या स्टेटसबद्दल सांगितलं होतं.
१ जानेवारी २०२३ रोजी म्हटलं आहे की, १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या सुमारे ९८.१२ टक्के नोटा परत आल्या आहेत.
(Source: RBI/Screenshot)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) विभागात स्पष्टपणे नमूद केलं आहे की, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये, १०० रुपये, २०० रुपये, ५०० रुपये आणि २००० रुपयांच्या नोटा जारी केल्या जात आहेत.
(Source: RBI/Screenshot)
रिझर्व्ह बँकेने सध्या जारी केलेल्या बँक नोटांच्या सेटचा फोटो आम्हाला सापडला. यातही ५००० रुपयांच्या नोटेचा फोटो नव्हता.
(Source: RBI/Screenshot)
कोणत्याही विश्वसनीय बातम्या नाहीत : RBI ने अशी घोषणा केली आहे असा दावा करण्यासाठी टीम WebQoof ला सार्वजनिक डोमेनमध्ये कोणतेही विश्वासार्ह बातम्या किंवा माहिती उपलब्ध नाही.
पीआयबीच्या तथ्य-तपासणी शाखेने स्पष्ट केलं : पीआयबीच्या तथ्य-तपासणी शाखेच्या अधिकृत एक्स हँडलने व्हायरल दावा फेटाळून लावला आणि त्याला "फेक" म्हटलं आहे.
४ जानेवारी रोजी पोस्ट शेअर करण्यात आली होती आणि पुढे असं म्हटलं आहे की, RBI ने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
याने आमच्या निष्कर्षांची पुष्टी केली आणि ५००० रुपयांच्या नोटा जारी केल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं.
निष्कर्ष
RBI ने ५००० रुपयांच्या नोटा जारी करण्याची घोषणा केलेली नाही हे स्पष्ट झालं आहे.
(सदर फॅक्ट चेक The quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)