Created By: Vishvas NewsTranslated By: ऑनलाईन लोकमत
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी एका बाळाला उचलून घेतलेलं दिसत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील केला आहे आणि हा फोटो त्यांची मुलगी दुआ हिचा आहे.
विश्वास न्यूजच्या तपासणीत असं आढळून आलं की, ही फोटो खरा नसून आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) टुल्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय आहे?
फेसबुक पेज Starreallife ने २१ डिसेंबर रोजी व्हायरल फोटो शेअर केला आणि लिहिलं, "दीपिका पादुकोण रणवीर सिंहसोबत बेबी दुआ विंटर एन्जॉय करत आहे”
व्हायरल पोस्टची आर्काइव्ह लिंक येथे पाहता येऊ शकते.
तपास
व्हायरल फोटोंची तपासणी करण्यासाठी, आम्ही हे फोटो काळजीपूर्वक पाहिले. त्यांचं टेक्सचर खूप स्मूथ आणि आर्टिफिशियल दिसत होतं.
आम्ही पडताळणीसाठी AI इमेज डिटेक्शन टूल्सवर एक एक करून व्हायरल इमेज तपासल्या.
पहिला फोटो
आम्ही हा फोटो AI इमेज डिटेक्शन टूल Hive Moderation ने तपासला, ज्यामध्ये हा फोटो AI द्वारे तयार होण्याची शक्यता ९९.४ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दुसरा फोटो
आम्ही हा फोटो AI इमेज डिटेक्शन टूल Hive Moderation ने देखील तपासला, ज्यामध्ये हा फोटो AI द्वारे तयार होण्याची शक्यता ९८.८ टक्के असल्याचं सांगण्यात आलं.
तिसरा फोटो
AI इमेज डिटेक्शन टूल Hive Moderation द्वारे तपासल्यानंतर असं आढळून आलं की हा फोटो AI द्वारे तयार होण्याची शक्यता ९९.७ टक्के आहे.
यानंतर, आम्ही कीवर्डच्या मदतीने शोधलं की, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांची मुलगी दुआचा चेहरा रिव्हील केला आहे का? रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एका प्रायव्हेट गॅदरिंगमध्ये त्यांची मुलगी दुआ हिच्याशी पापाराझीची ओळख करून दिली होती पण त्यावेळी फोटो काढण्यास सक्त मनाई होती.
मुंबईत बॉलीवूड कव्हर करणाऱ्या दैनिक जागरणच्या वरिष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी एका प्रायव्हेट गॅदरिंगमध्ये त्यांची मुलगी दुआ हिची पापाराझीची ओळख करून दिली होती, परंतु त्यावेळी फोटो काढण्यास मनाई होती. दुआचे कोणतेही चित्र पब्लिकली अव्हेलेबल करण्यात आलेलं नाही.
शेवटी आम्ही पोस्ट शेअर करणारे पेज स्कॅन केले. Starreallife या फेसबुक पेजला ४२ हजार लोक फॉलो करत असल्याचं आम्हाला आढळलं.
दीपिका पादुकोणच्या मुलीशी संबंधित इतर फॅक्ट चेक रिपोर्ट्स तुम्ही येथे वाचू शकता.
निष्कर्ष: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांची मुलगी दुआचा चेहरा रिव्हील केला आहे. मात्र, विश्वास न्यूजच्या तपासणीत हे फोटो एआयने तयार केल्याचं आढळून आलं. AI डिटेक्शन टूल्सने हे फोटो AI-निर्मित असल्याची पुष्टी केली. एका खासगी कार्यक्रमात रणवीर आणि दीपिकाने आपल्या मुलीची पापाराझींशी ओळख करून दिली होती, पण फोटो काढण्यास मनाई होती.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)