आताच्या घडीला सोशल मीडियाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारख्या लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मवरून लोकं खूप व्यक्त होत असतात. मात्र, सोशल मीडियावर फेक न्यूजचे प्रमाणही वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते अनेक स्तरांवर सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज, फोटोज, व्हिडिओ, फेक न्यूज याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अनेकदा लोकप्रिय, दिग्गज व्यक्तींच्या नावे अनेक गोष्टी खपवल्या जातात. याचाच प्रत्यय जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेले दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना आला आहे. याबाबत खुद्द रतन टाटा यांनी खुलासा केला आहे. (fact check ratan tata said viral post on using aadhaar for liquor sales is fake news)
TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड
आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. टाटा ग्रुपमधील अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र, रतन टाटा यांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही फेक न्यूज असल्याचे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे.
TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध
मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही
आधार कार्डच्या आधारे मद्यविक्री करण्यासंबंधी रतन टाटा यांनी वक्तव्य केल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये आहे. पोस्टमध्ये रतन टाटांच्या नावे लिहिण्यात आले आहे की, “आधार कार्डच्या माध्यमातून मद्यविक्री केली पाहिजे. मद्य खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारी अन्न अनुदान थांबवले पाहिजे. जे मद्य खरेदी करु शकतात ते नक्कीच अन्नही खरेदी करु शकतात. जेव्हा आपण त्यांनी मोफत अन्न देतो तेव्हा ते मद्य खरेदी करतात”. यावर, रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिले असून, ही फेक न्यूज आहे. मी असे कोणतंही वक्तव्य केलेले नाही. धन्यवाद, असे म्हटले आहे.
TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स
दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही अलीकडेच एका फेक न्यूजचा खुलासा केला आहे. याबाबत ट्विट करुन माहिती देताना महिंद्रा म्हणाले की, मला आनंद होतोय की, माझी वक्तव्ये लोक गांभीर्याने घेतात. मी नेहमी सोशल मीडियावर विविध गोष्टींना आणि ज्ञानाला शेअर करण्यावर विश्वास ठेवतो. पण, अनेकदा सोशल मीडियावर काही चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात.