Created By: Factly.inTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी कोटा येथील व्यापारी कुटुंबातील मोहम्मद अनिश नावाच्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमधून (इकडे, इथे आणि इथे) करण्यात आला आहे. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेऊया.
अर्काईव्ह पोस्टसाठी येथे क्लिक करा.
दावा काय आहे : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी मोहम्मद अनिश नावाच्या मुस्लिम मुलाशी लग्न केले.
फॅक्ट : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अनिश रजनी या सिंधी हिंदू मुलाशी लग्न केले. अनेक बातम्यांमधूनही याबाबत माहिती दिली गेली आणि गयाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य हरी मांझी यांनीही एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) या अफवांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हरी मांझी यांनी अंजली बिर्लांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. त्यामुळे पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही एक गुगल कीवर्ड सर्च केला. त्यानंतर आम्हाला १३ नोव्हेंबर २०२४ च्या बातम्या (येथे आणि येथे) सापडल्या. वृत्तानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी बिझनेसमन अनिश रजनीसोबत लग्न केले. अनिश एका सिंधी व्यापारी कुटुंबातील असून सध्या ते आपल्या कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यात व्यस्त आहेत.
याव्यतिरिक्त, आम्ही गयाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य हरी मांझी यांचे १३ नोव्हेंबर २०२४ रोजीचे एक ट्विट पाहिले, ज्यात अंजली बिर्ला यांच्या लग्नाविषयीच्या अफवांचे स्पष्टीकरण होते. त्यांनी सांगितले की अंजलीते पती, अनिश रजनी हे कोटा येथील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील सिंधी हिंदू आहेत आणि त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांच्या ट्विटमध्ये शेअर केली.
खरं तर यापूर्वी अंजली बिर्ला यांच्या बद्दलचा असाच दावा खोडून काढण्यात आला होता, ज्यात आरोप होता की त्यांची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) न बसता आयएएससाठी निवड झाली होती.
निष्कर्ष : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांनी मुस्लिम नाही तर सिंधी हिंदू असलेल्या अनिश रजनीशी लग्न केले आहे.
(सदर फॅक्ट चेक फॅक्टली इन या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)