शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

Fact Check : सैफ अली खानचा हॉस्पिटलच्या बेडवरचा 'तो' फोटो खोटा; जाणून घ्या, कुठून सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:07 IST

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सैफ अली खान याचा हॉस्पिटलमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Claim Review : सैफ अली खान याने रिक्षा चालकासोबत हॉस्पिटलमधून व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधला.
Claimed By : Social Media User
Fact Check : दिशाभूल

Created By: आज तक

Translated By: ऑनलाइन लोकमत

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १५ जानेवारी रोजी हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, आता त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली असून लवकरच डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 दरम्यान, आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सैफ अली खान याचा हॉस्पिटलमधील असल्याचा दावा केला आहे. या फोटोत एक व्यक्ती हॉस्पिटलमधील बेड असल्याचे दिसत आहे. या फोटोत आणखी एक व्यक्ती दिसत आहे.

 

दाव्यानुसार, सैफ अली खानने हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो चालक भजन सिंह राणाशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. व्हायरल झालेला फोटो हा प्रत्यक्षात सैफ आणि भजन सिंह राणा यांच्यातील व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट असल्याचे म्हटले जात आहे.भारत समाचार या माध्यम संस्थेने हा फोटो ट्विटरवर त्याच दाव्यासह शेअर केला आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अभिनेता सैफ अली खानचा हॉस्पिटलमधून पहिला फोटो. माझा जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हरशी व्हिडीओ कॉलवर बोललो. १६ जानेवारीच्या रात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर, उत्तराखंडमधील ऑटो चालक भजन सिंह राणा यांनी त्यांचे प्राण वाचवले. सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आणि पाठीच्या मणक्याजवळ गंभीर जखमी झालेल्या सैफला त्याचा मुलगा  आणि घरातील नोकर हरीसह लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरकाम करणाऱ्या नोकराने मदत मागितली तेव्हा राणाने जखमी सैफला रुग्णालयात नेले. सतत रक्तस्त्राव होत असतानाही सैफ शांत राहिला आणि त्याने राणाला रुग्णालयात पोहोचण्यासाठी किती अंतर आहे ते विचारले. राणाने सैफकडून भाडेही घेतले नाही”., असा या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

अनेकांनी हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे आणि दावा केला आहे की हा सैफ अली खानचा हॉस्पिटलमधील पहिला फोटो आहे. व्हायरल पोस्टची संग्रहित  येथे पाहता येईल.

आज तक फॅक्ट चेकमध्ये हे फोटो एडिट केलेले असल्याचे आढळले. मूळ चित्रातील व्यक्ती सैफ अली खान नसून दुसरीच कोणीतरी आहे. यामध्ये ऑटो चालकाचा चेहराही वेगळा जोडण्यात आला आहे.

सत्य कसे जाणून घ्यावे? 

जेव्हा आम्ही इमेज रिव्हर्स सर्च केली तेव्हा आम्हाला एका युट्यूब व्हिडिओमध्ये इमेजची मोठी इमेज सापडली. यामध्ये सैफचा चेहरा स्पष्ट दिसतोय. या फोटोला उलट शोधल्यावर आम्हाला मूळ फोटोही सापडला.

हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पिंटरेस्टवर एका वापरकर्त्याने शेअर केले आहे. यामध्ये सैफ नाही तर दुसराच कोणीतरी व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसतो.

ही पिंटरेस्ट पोस्ट कधी शेअर केली, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण हे दिसून येते की या फोटोवर काही महिन्यांपूर्वी कमेंट्स केल्या होत्या, यावरून हे देखील सिद्ध होते की हा फोटो जुना आहे.

फोटोतील तो व्यक्ती खरी कोण आहे हे आम्हाला कळले नाही. पण दोन्ही फोटोंची तुलना केल्यानंतर हे स्पष्ट होते की व्हायरल फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सैफचा चेहरा वेगळा जोडण्यात आला आहे.बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा अजूनही रुग्णालयातील फोटो समोर आलेला नाही. जर त्याचा खरोखरच एखादा फोटो आला असता तर तो बातम्यांमध्ये तसेच सोशल मीडियावरही आला असता.

वृत्तानुसार, सैफ आणि करीनाचा एआय वापरून तयार केलेला हॉस्पिटलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीही शेअर केला आहे.

(सदर फॅक्ट चेक Aaj Tak  या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान