Created By: आजतक Translated By: ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच फ्रान्स दौऱ्यावर गेले होते, त्याठिकाणी त्यांना टॅक्सीतून फिरावे लागले? सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्यात पंतप्रधानाबाबत हा दावा केला जात आहे. फ्रान्समध्ये मोदींच्या स्वागतासाठी सरकारी वाहनाऐवजी एक टॅक्सी पाठवल्याचा दावा या फोटोतून केला जात आहे.
काय आहे दावा?
व्हायरल होणाऱ्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ्या रंगाच्या कारजवळ उभे असलेले दिसतात. कारचा दरवाजा उघडा असतो, ज्यामुळे मोदी आत्ताच कारमधून उतरलेत हे दिसते. या कारच्या नंबर प्लेटच्या खाली निळ्या रंगात टॅक्सी लिहिलेले आढळते. या निळ्या रंगाच्या वाक्याला हाईलाईट करून हा दावा केला जात आहे. काही लोकांचे म्हणणं आहे की, हा फोटो फ्रान्सचा असून ज्याठिकाणी पंतप्रधान मोदींना नेण्यासाठी तिथल्या सरकारने टॅक्सी पाठवली.
काँग्रेस लाओ देश बचाओ नावाच्या एका फेसबुक पेजने हा फोटो शेअर करत लिहिलंय की, "अबे फ्रान्स वालो हमारे विष गुरू की ईतनी बेईज्जती तो मत करो"
(या पोस्टची आर्काइव्ह लिंक तुम्ही इथे पाहू शकता)
पडताळणीत काय आढळले?
फॅक्ट चेक पडताळणीत हा फोटो एडिटेड असल्याचं समोर आले, ज्यात टॅक्सीचा बोर्ड वेगळा चिटकवून व्हायरल केला जात आहे. खरा फोटो ऑक्टोबर २०२१ चा आहे जेव्हा पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी वेटिकन सिटी येथे गेले होते.
सत्य समजलं कसं?
व्हायरल होणाऱ्या फोटोत निळ्या प्लेटवर छोट्या अक्षरात La Prima App in Italia Per I Taxi लिहिले होते. किवर्च सर्च केल्यावर आढळलं की, हे टेक्स्ट फ्रान्स नाही तर इटलीच्या It taxi नावाच्या एका कॅब बुकिंग App संचालित टॅक्सीवर लिहिले होते. त्यातून हा फोटो बनावट असल्याचा संशय आला.
फोटोला रिवर्स सर्च केल्यावर आम्हाला ANI ची एक्स पोस्ट सापडली. ती ३० ऑक्टोबर २०२१ ला दुसऱ्या फोटोंसह शेअर केली होती. कॅप्शननुसार, हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी वेटिकन सिटीत पोहचले तेव्हाचे होते. ऑक्टोबर २०२१ साली जेव्हा पंतप्रधान मोदी जी २० शिखर संमेलनाला भाग घेण्यासाठी इटलीत गेले होते तेव्हा त्यांनी वेटिकन सिटीत जात पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती.
ANI च्या एक्स पोस्टमध्ये खरा फोटो आणि व्हायरल होणारा फोटो हे स्पष्ट पाहिले असता त्यातून हा फोटो एडिट करून त्यावर टॅक्सी लिहिलेला निळ्या रंगाची प्लेट दिसते हे समोर आले.
पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ इथे आणि इथे पाहू शकता.
त्यापूर्वी २०२१ साली जेव्हा पंतप्रधान मोदी जी २० शिखर संमेलनात सहभागी व्हायला इटलीला गेले होते. तेव्हाही अशाच प्रकारे दुसरा बनावट फोटो व्हायरल झाला होता.
(सदर फॅक्ट चेक आज तक न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)