Created By: Newsmeter Translated By: ऑनलाइन लोकमत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी याने मोठं काम केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ नंबरची जर्सी परिधान केली होती. २०२३ मध्ये, BCCI ने ७ क्रमांकाची जर्सी निवृत्त करून भारतीय क्रिकेटमधील त्याच्या अतुलनीय योगदानाचा गौरव केला. दरम्यान, आता गेल्या काही दिवसापासून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याच्याबाबतीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
या पोस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या विशेष योगदानाबद्दल भारतीय रिझर्व्ह बँक ७ रुपयांचे नवीन नाणे जारी करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली असून हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आता आरबीआयनेही महेंद्रसिंह धोनीचा सन्मान करण्यासाठी ७ रुपयांचे नाणे जारी करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. धोनीचा फोटो आणि नाव असलेली ७ रुपयांच्या नाण्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका वापरकर्त्याने कथित नाण्यांचा फोटो शेअर केला, या पोस्टमध्ये लिहिले, “आरबीआय महेंद्रसिंह धोनीच्या सन्मानार्थ ७ रुपयांचे नवीन नाणे जारी करेल, 'थाला' पुन्हा एकदा चमकला, हेच कारण आहे. (Archive)
Fact Check
NewsMeter ने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे, कारण अशी कोणतीही घोषणा आरबीआयने केलेली नाही.
आरबीआयच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती तपासण्याचा प्रयत्न केला. पण एमएस धोनीच्या सन्मानार्थ ७ रुपयांची नाणी जारी करण्यासंबंधी कोणतेही माहिती मिळाली नाही. आम्ही वेबसाइटच्या प्रेस रिलीज विभाग देखील पाहिला, १४ नोव्हेंबरपर्यंत अशी कोणतीही घोषणा केल्याचे यात समोर आले नाही. सध्या चलनात असलेल्या नाण्यांच्या याद्या तपासल्या यात ७ रुपयांच्या नाण्याची माहिती मिळाली नाही.
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवरील स्मरणार्थी नाण्यांच्या यादीचीही आम्ही माहिती घेतली. स्मरणार्थी नाणी महत्त्वाच्या घटना, व्यक्तिमत्त्वे, वर्धापन दिन साजरे करण्यासाठी जारी केली जातात आणि अनेकदा अनन्य डिझाईन्स फिचर बनवतात , ही यादी ते संग्रहित करुन ठेवतात. आम्हाला या यादीत एमएस धोनीच्या सन्मानार्थ जारी करण्यात आलेल्या ७ रुपयांच्या नाण्याचा उल्लेख आढळला नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला आढळले की एमएस धोनी असलेली नाणी मुळात ३ नोव्हेंबर रोजी Tathya या Instagram खात्याद्वारे पोस्ट केली होती. पोस्ट, एक लांबलचक कॅप्शनसह, दावा केला होता की आरबीआय धोनीचा सन्मान करण्यासाठी हे नाणे जारी करत आहे. या मथळ्याच्या शेवटी, हे स्पष्ट केले की हे पूर्णपणे मनोरंजन हेतूने तयार केली आहे.
या अकाऊंटच्या बायोमध्ये यावरील पोस्ट व्यंगचित्र आहेत अंस स्पष्टपणे नमुद केले आहे.
या संदर्भात पीआबीनेही एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी पीआयबीने ७ रुपयांच्या कथित नाण्याचा व्हायरल फोटो पोस्ट केला आणि ते बनावट असल्याचे स्पष्ट केले. भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल एमएस धोनीचा सन्मान करण्याबाबत आर्थिक व्यवहार विभागाने कोणतीही घोषणा केलेली नाही, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Archive)
त्यामुळे, भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल महेंद्रसिंह धोनीचा सन्मान करण्यासाठी आरबीआयने ७ रुपयांची नाणी जारी केल्याचा दावा खोटा आहे असा निष्कर्ष आम्ही काढतो.