Created By: द क्विंटTranslated By: ऑनलाइन लोकमत
सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही महिला एका बॉलिवूडच्या गाण्यावर नाचत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्यात दिसणारी ही वृद्ध महिला इतर कुणी नसून ९८ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
काय आहे दावा?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यावर कॅप्शन देण्यात आलं आहे की, प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री वैजयंती माला, वय ९८ वर्ष, या वयातही त्यांच्या जगण्याचा उत्साह आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहा असं लिहिलं आहे.
(या पोस्टची आर्काइव्ह लिंक तुम्ही इथे, इथे आणि इथे पाहू शकता)
पडताळणीत काय आढळलं?
संबंधित व्हिडिओ खोटा असून डिसेंबर २०२२ मधील हा व्हिडिओ आहे. त्यातील महिला प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला नाही. पोस्टमध्ये करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे.
सत्यता कशी पडताळली?
रिर्व्हस इमेज शोधण्यासाठी गुगल लेन्सची मदत घेण्यात आली. तेव्हा एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. त्यात हीच दृश्ये होती.
ओ जाने तमन्ना किधर जा रही हो या लोकप्रिय गाण्यावर एका ९३ वर्षीय आजीचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
रिपोर्टनुसार हे गाणे अभिनेते शम्मी कपूर आणि अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
डीडी न्यूजच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अभिनेत्रीची नुकतील मुलाखत घेतली गेली, त्यात त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले.
संबंधित व्हिडिओ १३ मे २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला, त्यावर पद्म पुरस्कार विजेत्या वैजयंती माला डीडी न्यूजशी बोलताना दिसतात.
वैजयंतीमाला यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त परफॉर्म केले, त्यात भरतनाट्यम सादर केले होते.
निष्कर्ष - व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील वृद्ध महिला कोण याची स्वतंत्रपणे ओळख होऊ शकली नाही परंतु संबंधित व्हिडिओ जुना असून त्यातील महिला ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला नाहीत हे स्पष्ट होते.
(सदर फॅक्ट चेक द क्विंट या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)