Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:07 IST2024-05-23T12:26:31+5:302024-05-24T14:07:25+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यात अलीकडेच राहुल गांधींच्या सभेत उसळलेली गर्दी असा खोटा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर
Created By: Vishvas News
Translated By: ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता उरलेल्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राहुल गांधींना ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचं हा व्हिडिओ शेअर करून दावा करण्यात आला आहे.
मात्र विश्वास न्यूजनं केलेल्या पडताळणीत या व्हायरल व्हिडिओत करण्यात येत असलेला दावा चुकीचा असल्याचं समोर आलं. मुळात हा व्हायरल व्हिडिओ राहुल गांधी यांच्या रॅलीचा नसून तो बिहारच्या महाराजगंजमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओ?
फेसबुक युजर रोहित मिश्रा याने २१ मे २०२४ ला व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्यावर कॅप्शन लिहिलं होतं, ही गर्दी पाहून मोदीजींना हे समजलं असेल कोण आहे राहुल?
ही अर्काईव्ह पोस्ट तुम्ही इथे पाहू शकता...
अशी केली पडताळणी
व्हायरल दाव्यातील सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही इनविड टूलच्या मदतीनं व्हिडिओचे किफ्रेम काढले आणि त्याला गुगल रिवर्स इमेजच्या मदतीने सर्च केले. तेव्हा व्हायरल व्हिडिओ (अर्काईव्ह लिंक) न्यूज एजेंसी IANS च्या अधिकृत एक्स अकाऊंटवर सापडला. व्हिडिओ २१ मे २०२४ रोजी अपलोड झाला होता. बिहारच्या महाराजगंज भागातील ही रॅली होती.
Maharajganj, Bihar: Aerial view of PM Modi's rally pic.twitter.com/zPBg9oNMhA
— IANS (@ians_india) May 21, 2024
माहितीनुसार, आम्ही गुगलवर संबंधित किवर्ड्सच्या मदतीने सर्च केले. तेव्हा व्हायरल व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी (अर्काईव्ह लिंक) आणि भारतीय जनता पार्टी (अर्काईव्ह लिंक) च्या अधिकृत एक्स खात्यावर मिळाला. व्हिडिओ २१ मे २०२४ रोजी शेअर केला होता. इथं व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराजगंजच्या रॅलीचा असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, महाराजगंज इथं उसळलेली गर्दी सांगतेय, बिहारमध्ये भाजपा-एनडीएच्या माझ्या सहकाऱ्यांना अभूतपूर्व आशीर्वाद मिळत आहे.
महाराजगंज में उमड़ा ये जनसैलाब बता रहा है कि बिहार में भाजपा-एनडीए को अभूतपूर्व आशीर्वाद मिल रहा है! pic.twitter.com/GY2uHtVPuj
— BJP (@BJP4India) May 21, 2024
महाराजगंज में उमड़ा जनसैलाब बता रहा है कि बिहार में भाजपा-एनडीए को यहां के मेरे परिवारजनों का अभूतपूर्व आशीर्वाद मिल रहा है! pic.twitter.com/NHfi9tofB4
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2024
पत्रकार रुबिका लियाकत यांनीही २१ मे २०२४ रोजी हा व्हिडिओ (अर्काईव्ह लिंक) बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या आधीचे दृश्य म्हणून शेअर केला होता.
पीएम की रैली से पहले बिहार के महाराजगंज की तस्वीरें pic.twitter.com/j5dYnawNHe
— Rubika Liyaquat (@RubikaLiyaquat) May 21, 2024
अधिक माहितीसाठी आम्ही या रॅलीचं वृत्तांकन करणाऱ्या दैनिक जागरण महाराजगंजचे रिपोर्टर किर्ती सीवान यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा हा व्हायरल व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा असल्याचं ते म्हणाले.
अखेर आम्ही हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करणाऱ्या युजरचं अकाऊंट तपासले तेव्हा या युजरनं याआधीही बऱ्याच फेक पोस्ट शेअर केल्या आहेत. यूजर हा हिमाचल प्रदेशात राहणारा असल्याचं त्याच्या अकाऊंटरवरून दिसते.
निष्कर्ष - व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीत जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. मुळात हा व्हिडिओ राहुल गांधी यांच्या रॅलीचा नाही तर बिहारमधील महाराजगंजच्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीचा आहे.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)