Fact Check: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मत द्या; रवीना टंडनचा दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:41 PM2024-04-26T20:41:56+5:302024-04-26T20:50:53+5:30

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Fact Check Vote for Congress in Lok Sabha elections Raveena Tandons misleading video goes viral | Fact Check: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मत द्या; रवीना टंडनचा दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल

Fact Check: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मत द्या; रवीना टंडनचा दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल

Claim Review : दावाः रविना टंडन म्हणाली यावेळी काँग्रेस जिंकेल!
Claimed By : Akhilesh.lover. Facebook Page
Fact Check : दिशाभूल

Created By: पीटीआय
Translated By : ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. जवळपास १५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रवीना टंडन ही काँग्रेससाठी मतं मागत दिसल्याचं दिसत आहे. संपूर्ण देशात विकासाची गरज आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा विजय व्हावा, अशी माझी इच्छा असल्याचं या व्हिडिओमध्ये रवीना टंडनने म्हटल्याचा दावा केला जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया यूजर्सही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

या व्हायरल व्हिडिओची पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपासणी केली असता व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा असल्याचं आढळून आलं. अभिनेत्री रवीना टंडन हिने २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाचा प्रचार केला होता. मात्र हा व्हिडिओ ताजा असल्याचा दावा करत आता व्हायरल केला जात आहे.

काय आहे दावा?

Akhilesh.lover. या फेसबुक यूजरने २५ एप्रिल रोजी रवीना टंडनचा व्हायरल व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, "यावेळी काँग्रेसच जिंकणार, असं रवीना टंडन म्हणाली आहे."

पायल गुप्ता नावाच्या यूजरनेही अगदी तशाच दाव्यासह रवीना टंडनचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही पोस्ट आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. 

तपासणी

व्हायरल व्हिडिओमागील सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम रवीना टंडन, काँग्रेस, समर्थन असे संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगलवर सर्च केले. यावेळी आम्हाला एबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर तब्बल ११ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ आढळून आला.  १२ डिसेंबर २०१२ रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रवीना टंडन ही काँग्रेस पक्षासाठी मतदान मागत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ डिस्क्रिप्शननुसार, रवीना टंडनने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता. रोड शोच्या दरम्यान तिने काँग्रेस उमेदवाराला साथ देण्याचं आवाहन केलं होतं. 

तपासणीदरम्यान आम्हाला रवीना टंडनच्या तत्कालीन रोड शोचा संपूर्ण व्हिडिओदेखील मिळाला. DeshGujaratHD नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओत रवीना टंडन ही प्रचाराच्या वाहनावर उभी असलेली दिसत आहे. 

आमच्या आतापर्यंत तपासणीत हे स्पष्ट झालं आहे की, रवीना टंडनचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नसून २०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील आहे. मात्र तो ताजा व्हिडिओ असल्याचं सांगून यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिशाभूल करणारे दावे केले जात आहे.

(सदर फॅक्ट चेक 'पीटीआय' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)
 

Web Title: Fact Check Vote for Congress in Lok Sabha elections Raveena Tandons misleading video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.