Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील नऊ प्रांतांपैकी पाच प्रांतांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे. एकीकडे ओमायक्रॉन विषाणूची भीती आहे, तर दुसरीकडे यावरील एक चित्रपटही १९६३ मध्ये प्रदर्शिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, याचा एक पोस्टरही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो सध्या सर्वाच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या 'द ओमायक्रॉन व्हेरिअंट' नावाच्या चित्रपटाचा एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या दिवशी पृथ्वीला स्मशानस्वरूपात बदललं होतं, असंही टॅगलाइन यात देण्यात आली आहे. हा चित्रपट १९६३ मध्ये प्रदर्शित झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा पोस्टर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या महासाथीची दीर्घकाळापासून योजना आखली जात होती असंही म्हटलं होतं. याशिवाय बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीदेखील या चित्रपटाचा व्हायरल पोस्टर शेअर केला होता.