Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:10 PM2024-05-27T21:10:33+5:302024-05-27T21:12:18+5:30

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक सेल्फी शेअर केला. त्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावरुन टिका केली जात होती.

Fact Chek The viral picture behind Rahul and Sonia Gandhi is not of Jesus Christ | Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही

Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही

Claim Review : राहुल गांधी यांच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: News Mobile
Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्यासोबत दिल्लीत मतदान केले. यानंतर, सोनिया आणि राहुल गांधींचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात दोघेही शाईची बोटे दाखवत आहेत. यावरुन असा दावा केला आहे की त्यांच्या मागे असलेल्या पोस्टरमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो आहे.

हा फोटो या कॅप्शनसह शेअर केला आहे : "जनेउधारी ब्राह्मण” राहुल गांधी यांच्या खोलीत येशूचा फोटो आहे… याच खोलीत हिंदू देवतांचे फोटो नाही… छान!’. (अर्काइव्ह लिंक)

(सौजन्य : X)
(सौजन्य : X)

फॅक्ट चेक

हा दावा तपासला असता तो खोटा असल्याचे आढळले.

व्हायरल फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर, सेल्फीमध्ये असलेल्या पोस्टरमध्ये तीन वेगळे लाल ठिपके दिसले. येशू ख्रिस्ताच्या चित्रांमध्ये असा तपशील असामान्य आहे. हा फोटो क्रॉप केल्यावर आणि रिवर्स सर्च केल्यावर, आम्हाला हा फोटो MeisterDrucke वेबसाइटवर मिळाला, जिथे त्यावर निकोलस रोरिकची कलाकृती “मॅडोना ओरिफ्लेमा, १९३२” असे लिहिलेले आढळले.

(सौजन्य : Meisterdrucke)
(सौजन्य : Meisterdrucke)

WikiArt ने निकोलस रोरिकचे वर्णन एक बहुआयामी रशियन व्यक्तिमत्व म्हणून केले आहे, जो चित्रकार, लेखक, पुरातत्वशास्त्रज्ञ, थिऑसॉफिस्ट आणि सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. रशियातील काहीजण त्यांना ज्ञानी, तत्त्वज्ञ आणि आध्यात्मिक प्रभावशाली मानतात. तरुणपणी रशियन समाजातील आध्यात्मिक चळवळीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. रोरिकच्या उल्लेखनीय कलाकृतींपैकी एक म्हणजे मॅडोना ओरिफ्लेमा, जी प्रतीकात्मक शैलीतील त्याच्या प्रभुत्वाचे उदाहरण देते. अधिक सखोल विश्लेषण आणि तुलना करण्यासाठी येथे एक फोटो देण्यात आला आहे.

त्यामुळे, राहुल गांधींच्या सेल्फीमागील व्हायरल पोर्ट्रेट येशू ख्रिस्ताचे नसून एक कलाकृती असल्याचे स्पष्ट होते.

(सदर फॅक्ट चेक News Mobile या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Chek The viral picture behind Rahul and Sonia Gandhi is not of Jesus Christ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.