तुम्हाला तुमच्या WhatsApp वर 'काऊन्सिल फॉर अलायन्स अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स'च्या नावानं रजिस्ट्रेशन फॉर्म आला असेल तर सतर्क व्हा. कारण अशा पद्धतीचा कोणताही फॉर्म व्हॉट्सअॅपकडून जारी करण्यात आलेला नाही. तुम्हाला आलेली फाइल पूर्णपणे खोटी असून यामाध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. PIBनं याबाबत फॅक्ट चेक केलं असून सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?PIBनं केलेल्या फॅक्टचेकमध्ये आढळून आलं आहे की व्हॉट्सअॅपवर एक 'काऊन्सिल फॉर अलायड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स अॅक्ट, २०२१' या नावानं एक फॉर्म व्हायरल केला जात आहे. संबंधित फॉर्म पूर्णपणे खोटा असून संबंधित संस्थेला तसं करण्यासाठी कोणताही अधिका देण्यात आलेला नाही असं स्पष्ट केलं आहे. याशिवाय यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानंही कोणत्याही प्रकारची मान्यता दिलेली नाही.
PIB नं संबंधित अॅप्लिकेशन फॉर्मचा एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. फॉर्ममध्ये वापरकर्त्यांची वैयक्तिक माहितीची विचारणा केली गेल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. यात व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, आधार कार्ड क्रमांक, पत्ता, शहर, राज्य, पिनकोड आणि इतर माहिती भरण्यास सांगितलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तीशी निगडीत संपूर्ण व्ययक्तिक माहिती घेऊन फ्रॉड करण्याचा मनसुबा यामागे असून अशा प्रकारचा कोणताही फॉर्म भरू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर अशापद्धतीचा वैयक्तिक माहिती विचारणारा फॉर्म आला तर त्यात कोणतीही माहिती भरू नका.