Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 06:00 PM2024-05-30T18:00:40+5:302024-05-30T18:11:38+5:30

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे, या आधीच सट्टा बाजाराचे आकडे व्हायरल झाले आहेत.

fake news news 24 fake graphic showing india alliance lead in lok sabha elections | Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य

Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य

Claim Review : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'न्यूज 24'या चॅनेलचे सट्टा बाजाच्या आकड्याबाबत एक ग्राफिक व्हायरल झाले आहे.
Claimed By : Facebook And X Users
Fact Check : चूक

Created By: Boom 
Translated By: ऑनलाइन लोकमत

देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत, लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होत असून ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी निकालाचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. देशातील  सट्टा बाजारांनीही विजयाचे आकडे सांगितले आहेत. दरम्यान, सोशल कालपासून मीडियावर 'न्यूज24' या चॅनेलचे एक ग्राफीक्स व्हायरल झाले आहे. यात इंडिया आघाडी आघाडी घेईल असं सांगितलं आहे. 

या ग्राफिकमध्ये, फलोदीसह विविध सट्टेबाजी बाजारांच्या संदर्भात अंदाज दिले आहेत. या अंदाजानुसार लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या जागांमध्ये घट झाली आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला जागा वाढल्याचा दावा केला आहे. 

लोकसभेतील बहुमताचा आकडा २७२ आहे. ग्राफिकमध्ये फलोदी, पालनपूर, कर्नाल, बोहरी, बेळगाव, कोलकाता, विजयवाडा येथे एनडीए आणि विरोधी आघाडी यांच्यात मोठी लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर इंदूर सराफ आणि सुरत माघोबी यांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे.

BOOM ला त्याच्या तथ्य तपासणीत हे ग्राफिक बनावट असल्याचे आढळले. 'न्यूज 24'चे कार्यकारी संपादक मानक गुप्ता यांनीही सोशल मीडियावर याबाब पोस्ट करून या ग्राफिकचे खंडन केले आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर हे ग्राफिक शेअर करत एका युजरने लिहिले की,'देश बदलाकडे वाटचाल करत आहे. देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सट्टेबाजीने भाजप नेत्यांची झोप उडवली आहे. इंडिया आघाडीकडून लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत, शेवटचा टप्पा बाकी आहे, भाजपच्या जागा आणखी कमी होतील आणि युतीच्या जागा वाढतील.#FilmyModi #INDIA.

पोस्टची आर्काइव लिंक.

याशिवाय अनेक काँग्रेस नेते आणि समर्थकांनीही या बनावट ग्राफिकचे आकडे खरे असल्याचे समजून शेअर केले आहेत. इकडे, इकडे पहा.

फॅक्ट चेक:

व्हायरल ग्राफिक काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, आम्हाला आढळले की त्यावरील News 24 लोगो खरा नाही.

पुढे, आम्हाला व्हायरल कमेंट सेक्शनमध्ये 'न्यूज 24' चे पत्रकार मानक गुप्ता यांचे उत्तर सापडले, तिथे त्यांनी सांगितले की न्यूज 24 ने अशी कोणतीही स्टोरी केलेली नाही.

पोस्टची आर्काइव लिंक.

याशिवाय, मानक गुप्ता यांच्या एक्स हँडलवर आम्हाला या संबंधित आणखी एक पोस्ट सापडली. या पोस्टमध्येही हे व्हायरल ग्राफिक शेअर करताना त्यांनी हे बनावट असल्याचे लिहिले होते.

पोस्टची आर्काइव लिंक.

न्यूज वेबसाइट ईटीव्ही भारतच्या मते, नुकताच फलोदी सट्टा बाजारने एक अंदाज जारी केला. या अंदाजात भाजपला ३०६-३१० जागा आणि एनडीए आघाडीला ३४६-३५० जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: fake news news 24 fake graphic showing india alliance lead in lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.