शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
3
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
4
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
5
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
6
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
7
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
8
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
9
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
10
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
12
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
13
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
14
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
15
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
16
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
17
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
18
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
19
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
20
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

Fact Check : भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सर्व युजर्सना देताहेत मोफत रिचार्ज?, हे आहे 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:38 AM

Fact Check : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देण्याची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा आहे.

Claim Review : नरेंद्र मोदी भाजपाचा विजय साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना ७१९ रुपयांचा ८४ दिवसांचा मोफत रिचार्ज देत आहेत.
Claimed By : WhatsApp User
Fact Check : चूक

Created By: News CheckerTranslated By: ऑनलाइन लोकमत

नरेंद्र मोदीभाजपाचा विजय साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना ७१९ रुपयांचा ८४ दिवसांचा मोफत रिचार्ज देत आहेत.

WhatsApp टिप लाइन (9999499044) वर आम्हाला हा दावा मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देण्याची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले. पण दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट आम्हाला सापडलेले नाहीत.

आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आणि भाजपाची अधिकृत वेबसाइट शोधली. परंतु या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही माहिती ही पुढील तपासात आढळली नाही.

आम्ही शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केलं. ही लिंक ‘mahirfacts’ नावाच्या वेबसाइटवर उघडते. ही वेबसाइट आम्हाला संशयास्पद वाटली, म्हणून आम्ही ती स्कॅम डिटेक्टरवर तपासली. स्कॅम डिटेक्टरने वेबसाइटचे वर्णन असुरक्षित आणि धोकादायक असं केलं आहे.

जेव्हा आम्ही पुढील तपासात, या वेबसाइटवर रिचार्जचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या बटणावर क्लिक केलं व्हा आम्हाला समजलं की ही एक फिशिंग लिंक आहे, जी ब्लॉग स्पॉटच्या वेबसाइटवर जाते. ब्लॉग स्पॉटच्या मदतीने तयार केलेल्या या पेजवर, युजर्सना त्यांचा मोबाइल नंबर विचारला जातो.

आम्ही ‘who is’ या वेबसाइटशी संबंधित इतर माहितीची देखील तपासणी करतो. हे डोमेन 30 मे 2023 रोजी ‘HOSTINGER operations, UAB’ या नावाने नोंदणीकृत झाल्याचं येथे नमूद केलं आहे.

तपासातून, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज दिल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. आम्ही आमच्या वाचकांना आवाहन करतो की कृपया कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. अशा लिंक्स धोकादायक असू शकतात.

SourcesOfficial website of BJP.Official X handles of Narendra Modi and BJP.Scam Detector.Whois.com.

(सदर फॅक्ट चेक  News Checker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल