शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:44 AM

Fact Check : सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो 'अबकी बार 400 पार' म्हणतो. घोषणाबाजीमुळे तो मानसिकरित्या आजारी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे.

Claim Review : 'अबकी बार 400 पार' सतत म्हटल्यामुळे एक व्यक्ती मानसिकरित्या आजारी पडला.
Claimed By : facebook User
Fact Check : चूक

Created By: Boom Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो 'अबकी बार 400 पार' म्हणत आहे. घोषणाबाजी केल्यामुळे तो मानसिकरित्या आजारी झाल्याचा दावा केला जात आहे.

बूमने केलेल्या तपासात असं आढळून आलं की व्हायरल व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. व्हिडिओमध्ये पेशंट म्हणून अभिनय करणारे जम्मूचे रहिवासी डॉ. राजेंद्र थापा यांनी बूमला सांगितलं की, हा मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला व्हिडिओ आहे.

या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीसोबत 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत भारतीय जनता पक्ष "अबकी बार 400 पार..." चा नारा देत आहे.

व्हिडिओमध्ये काही लोक गंभीर अवस्थेत दिसलेल्या व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन जाताना दिसत आहेत आणि तेथे त्याला इंजेक्शनही दिले जात असल्याचं दिसत आहे.

एका फेसबुक युजरने व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, "400 पार करता करता हा वेडा झाला आहे."

आर्काइव्ह पोस्ट

हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर शेअर करताना सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी लिहिलं की, "अच्छे दिन गेले, यावेळी आम्ही 400 पार."

आर्काइव्ह पोस्ट

फॅक्ट चेक

BOOM ने व्हायरल व्हिडीओ टू फॅक्ट चेकशी संबंधित कीवर्डसह Google शोधला. आम्हाला एन्क्वायरर टुडे न्यूज नावाच्या Facebook पेजवर अभिनय करणाऱ्या व्यक्तीचा मुलाखतीचा व्हिडीओ सापडला. व्हिडिओतील व्यक्तीचे नाव डॉ राजेंद्र थापा असल्याचं सांगण्यात आलं. मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये तो व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल बोलत होता.

यातून बोध घेत राजेंद्र थापा यांची चौकशी करून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते जम्मू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून सेवानिवृत्त सीएमओ आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक चित्रपटांमध्येही अभिनय करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल डॉ. राजेंद्र थापा यांनी BOOM ला सांगितलं की, "हा स्क्रिप्टेड व्हिडीओ सुमारे 2 आठवड्यांपूर्वी बनवण्यात आला होता. आम्ही एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो, याच दरम्यान मी भाजपाच्या एका कार्यक्रमातून परतलो होतो, तेव्हा मला अचानक ही कल्पना सुचली. आणि मी माझ्या मित्रांसोबत हा मनोरंजनाचा व्हिडीओ बनवला जो अचानक व्हायरल झाला आहे."

ते पुढे म्हणाले, "लोकांना हा छोटा व्हिडीओ खूप आवडला आहे, त्यामुळे त्याचा दुसरा भागही बनवला आहे, आता त्याचा तिसरा आणि चौथा भागही येणार आहे."

डॉ. राजेंद्र थापा यांनी BOOM ला दिलेल्या माहितीनुसार, ते देखील एक सामाजिक कार्यकर्ते आणि 2020 पासून आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत. ते जम्मूच्या डॉक्टर्स विंगचे अध्यक्षही आहेत.

आम्हाला डॉ. राजेंद्र थापा यांच्या फेसबुक प्रोफाइलवर स्क्रिप्ट केलेले दोन्ही व्हिडिओ सापडले.

डॉ राजेंद्र थापा यांना जेके लाईन न्यूज नावाच्या फेसबुक पेजवर व्हायरल व्हिडिओबद्दल मुलाखत देताना देखील पाहता येईल.

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा