Created By: BOOM Translated By: ऑनलाइन लोकमत
2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हवाल्याने एका पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. 'Next PM Rahul Gandhi Confirm' असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, शाहरुख खाननेराहुल गांधी देशाचे पुढचे पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे.
BOOM ला तपासात असं आढळून आलं की व्हायरल झालेला स्क्रीनशॉट पूर्णपणे खोटा आहे. शाहरुख खानने त्याच्या एक्स अकाउंटवरून अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही.
एका एक्स युजरने "आता तर शाहरुख खाननेही राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याचं म्हटलं आहे" असं म्हटलं आहे.
फॅक्ट चेक
BOOM ने शाहरुख खानचं एक्स हँडल चेक केलं तेव्हा त्यांना अशी कोणतीही पोस्ट मिळाली नाही, ज्यामध्ये त्याने राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याबद्दल म्हटलं आहे. शाहरुख खानची शेवटची पोस्ट 29 मे 2024 ची आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' संघाचे IPL 2024 जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यानंतर आम्ही सोशल ब्लेड टूलवर शाहरुख खानचं एक्स अकाउंट तपासलं. त्यानुसार मे महिन्यात त्याने केवळ दोनच पोस्ट केल्या होत्या. सोशल ब्लेड हे सोशल मीडिया प्रोफाइल एनालिटिकल टूल आहे. त्याच्या मदतीने डिलीट केलेल्या पोस्टची माहितीही मिळू शकते.
शाहरुख खानच्या एक्स हँडलवरही मे महिन्यातील फक्त दोनच पोस्ट आढळतात. 18 मे 2024 रोजी केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये (अर्काइव्ह लिंक) त्यांनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय दुसरी कोणतीही पोस्ट नाही. मुंबईत 20 मे रोजी लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत होतं, त्या पार्श्वभूमीवर शाहरुखने ही पोस्ट केली होती.
शाहरुखच्या X अकाऊंटमधून केलेल्या पोस्टशी सोशल ब्लेडच्या निकालांची जुळवाजुळव केल्यानंतर एकही पोस्ट डिलीट करण्यात आलेली नाही हे समोर आलं आहे.
यानंतर आम्ही एक्स वर एडवान्स सर्चद्वारे तपास केला. आम्हाला पोस्टमध्ये असे कोणतेही रिप्लाय मिळाले नाहीत जे कोणत्याही डिलीट केलेल्या पोस्ट दाखवत आहेत. जसं की एक्सवर कोणतीही पोस्ट डिलीट केल्यानंतर त्या पोस्टवर केलेले रिप्लाय दाखवले जातात.
या व्यतिरिक्त, आम्ही या दाव्यासंदर्भात मीडिया रिपोर्ट्स देखील शोधले परंतु आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळली नाही. शाहरुख खानने जर कोणाला समर्थन केलं असतं तर ही मोठी बातमी झाली असती.
(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)