Fact Check: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:33 PM2022-02-28T13:33:05+5:302022-02-28T13:34:01+5:30

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की लष्करी गणवेश परिधान करुन रशियाविरुद्धच्या युद्धात सामील झाल्याचा दावा करणारे त्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत केले जात आहेत.

Ukraine Presidents Old Images Getting Viral As Recent In Ukraine Crisis Context | Fact Check: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य

Fact Check: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य

googlenewsNext

मुंबई-

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. तसंच युक्रेनमधील युद्धाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होताना दिसून येत आहेत. रशियासारख्या बलाढ्य लष्करी राष्ट्रासमोर दोन हात करणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. झेलेंस्की थेट लष्करी गणवेश परिधान करुन रशियाविरुद्धच्या युद्धात सामील झाल्याचा दावा करणारे त्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत केले जात आहेत. पण फोटोंमागचं सत्य नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता नेमकी कोणती माहिती समोर आली ते जाणून घेऊयात...

दावा काय?
सोशल मीडियात सध्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की रशियाविरुद्धच्या युद्धात थेट लष्करात सामील झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यातील काही पोस्टच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. 

Nasser F Ayuob यांनी फेसबुकवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत ते रशियाविरोधात लढण्यासाठी रणभूमीवर उतरले असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

https://www.facebook.com/516143105/posts/10158621704458106/?d=n

फेसबुकवर आणखी काही पोस्टमधून झेलेंस्की लष्करात सामील होत रशियाविरोधातील युद्धात दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

https://www.facebook.com/107884398208006/photos/a.109408194722293/246317571031354/?type=3

पडताळणीत काय आढळून आलं?
वोलोदोमिर झेलेंस्की यांचे लष्करी गणवेशातील चार फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या चारही फोटोंची 'लोकमत'नं पडताळणी केली. 

फोटो क्रमांक- १

वरील फोटोची पडताळणी गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून केली असता Financial Times नं १९ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित केलेलं एक वृत्त समोर आलं. ‘Ukraine president fights oligarch on home front as Russia threat looms’ अशा मथळ्याची बातमी समोर आली. बातमीत वापरण्यात आलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये The caption said: Rinat Akhmetov, Ukrainian businessman and oligarch, left, and Ukraine’s President Volodymyr Zelensky © FT Montage/AFP/Getty/EPA अशी माहिती देण्यात आळी आहे. 

आता आम्ही Getty Images च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित कीवर्ड सर्चच्या माध्यमातून पडताळणी केली असता हाच फोटो ६ डिसेंबर २०२१ रोजीचा असल्याचं आढळलं. 

फोटोचं कॅप्शन पुढीलप्रमाणे: Ukrainian President Volodymyr Zelensky visits the front-line positions of the Ukrainian military in Donbass, Ukraine on December 06, 2021. (Photo by Ukrainian Presidency / Handout/Anadolu Agency via Getty Images)

फोटो क्रमांक- २ 

वरील फोटोची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुन्हा एकदा गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा पर्याय अवलंबला असता China Daily नं १० एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित केलेलं वृत्त आढळून आलं. फोटोचं कॅप्शन तपासून पाहिलं असता पुढील माहिती समोर आली. फोटोचं कॅप्शन: Ukraine’s President Volodymyr Zelensky visits positions of armed forces near the frontline in Donbass region, Ukraine, on Thursday. UKRAINIAN PRESIDENTIAL PRESS SERVICE/REUTERS 

फोटो क्रमांक- ३

वरील फोटोची पडताळणी करण्यासाठी पुन्हा एकदा गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करुन फोटोचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. यात हाही फोटो ६ डिसेंबर २०२१ रोजीचा असल्याचं दिसून आलं आहे. मूळ फोटो Getty Images नं टिपलेला असून त्याचं कॅप्शन पुढीलप्रमाणे: Ukrainian President Volodymyr Zelensky visits the front-line positions of Ukrainian military in Donbass, Ukraine on December 06, 2021. (Photo by Ukrainian Presidency / Handout/Anadolu Agency via Getty Images)

फोटो क्रमांक- ४

वरील फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून पडताळणी करुन पाहिला असता Kyiv Post ची बातमी सापडली. या बातमीचा फोटो आणि वरील फोटो तोच असल्याचं दिसून येतं. या फोटोचं कॅप्शन वाचलं असता संबंधित फोटो ८ एप्रिल २०२१ रोजीचा असल्याचं स्पष्ट झालं. फोटोचं कॅप्शन पुढील प्रमाणे- This handout picture taken and released by Ukrainian Presidential Press Service on April 8, 2021 shows Ukrainian President Volodymyr Zelensky on the frontline near Zolote, Luhansk region, eastern Ukraine.

त्यामुळे वरील चारही फोटो २०२१ या वर्षातील असल्याचं पडताळणीतून समोर आलं आहे. याशिवाय, युक्रेनमधील कोणत्याही माध्यमांनीही राष्ट्राध्यक्ष स्वत: युद्धात उतरल्याची बातमीची पुष्टी केलेली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की सध्या राजनैतिक चर्चेत व्यग्र असून देशाचा प्रमुख म्हणून त्यांचं याचं भूमिकेला प्रथम प्राधान्य असतं हेही समजून घ्यायला हवं. 

निष्कर्ष-
लष्करी गणवेशातील युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोदोदिमिर झेलेंस्की यांचे फोटो आताचे रशिया विरुद्धच्या युद्धातील नसून ते २०२१ या सालातील आहेत हे सिद्ध झालं आहे. 

Web Title: Ukraine Presidents Old Images Getting Viral As Recent In Ukraine Crisis Context

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.