भंगारातून साकारणार 411 कोटींचा यॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2016 2:28 PM
एडमिस्टन अँड कंपनीने या कार्गो शिपला यॉटचे रुप देण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या अनेक ‘मेकओव्हर’ शोमध्ये जुन्या गाड्या, घरांचा संपूर्ण कायापलट करून एकदम नवीन केले जाते. अगदी काहीसे तसेच आता या निकामी असलेल्या कार्गो शिपच्या बाबातीत घडणार आहे.लक्झरी यॉट आणि आलिशान जहाजे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एडमिस्टन अँड कंपनीने या कार्गो शिपला यॉटचे रुप देण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे या नव्या यॉटची किंमत 62 मिलियन डॉलर्स (411 कोटी रु.) एवढी असणार आहे.‘व्हीएआरडी १’ नावाची ही कार्गो शिप सुमद्रातील ट्रक म्हणून ओळखली जाते. दुरवरच्या किनाऱ्यावर साधनसामग्री पोहचविणे त्यांचे काम असते. सुमारे 30 दिवस पुरेल एवढा सप्लाय यामध्ये आहे.‘व्हीएआरडी 1’पासून तयार करण्यात येणाऱ्या या यॉटमध्ये या सर्व सुविधा असतील. 36 लोकांना राहण्याची व्यवस्था यामध्ये आहे. तसेच हेलिपॅडचीसुद्धा सुविधा आहे. एक महिना कोणत्याही सप्लायशिवाय ही यॉट समुद्रात राहू शकते.