शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

​५ सवयी ज्या बदलून टाकतील तुमचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2016 6:22 PM

जाणून घ्या यशस्वी लोकांच्या दैनंदिन सवयी ज्यामुळे ते ठरतात प्रत्येक कामात यशस्वी!

यशस्वी लोकांकडे पाहिले की, मनात आपसूकच विचार येतो- कसे जमते या लोकांना? काय असेल त्यांच्या यशाचे रहस्य? अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी करत असतील ते? पण म्हणतात ना की, महान लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते फक्त वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी करतात. त्यांचा कामाप्रती असलेला दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो. त्याबरोबरच ते सतत काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतात. आजन्म विद्यार्थी राहण्याकडे त्यांचा कल असतो.शिस्त, कर्तव्यदक्षता, ध्येयनिष्ठा आदी गुणांमुळे ते आपल्या कामात आणि पर्यायाने आयुष्यात सफल होतात. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. त्यांच्या पाच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गरजेच्या सवयींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पाच सवयी यशस्वी लोक जातीने आपल्या दैनंदिन जीवनात जपत असतात. तुम्हालाही त्यांच्याप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हीसुद्धा या सवयी अंगीकारल्या पाहिजेत.१. वाचा, खूप वाचा‘वाचाल तर वाचाल’ असे आपण सर्वांनी शाळेत ऐकले असेल. वाचनाचे महत्त्व केवळ ज्ञान मिळविण्यापुरते मर्यादित नाही. वाचनामुळे आपली आकलन क्षमता वाढते. म्हणजे नवीन गोष्टी झटपट कळून घेण्यात आपण अग्रेसर राहतो. म्हणजे स्पर्धेच्या युगात नव तंत्रज्ञान असो वा नवी पद्धती, जो लवकरात लवकर ती आत्मसात करेल तोच विजेता ठरतो. म्हणून मित्रांनो, रोजच्या रोज वेळ काढून वाचा. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र असे जे मिळेल ते मन लावून वाचा. २. सरावचुका करणे हा मानवी स्वभाव आहे; परंतु सरावाने त्या चुका टाळता येऊ शकतात. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात किंवा जी गोष्ट तुम्हाला अवघड वाटते, त्याचा रोज सराव करा. सरावामुळे तुम्ही ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे करून होणाऱ्या चुका टाळू शकता. सरावाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. यातून तुम्हाला तुमच्या क्षमतांचा अचूक अंदाज येईल आणि त्यामध्ये काय सुधारणा करता येतील हे लक्षात येईल. म्हणजे सगळ्या तऱ्हेने प्रॅक्टिस आपल्या फायद्याची असते.३. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका‘अनुभवापेक्षा मोठा शिक्षक नाही’ असे म्हणतात ते खरे आहे. मग अनुभव तो स्वत:चा असो की दुसऱ्यांचा, त्यातून शिकण्याची सवय आपल्यामध्ये असायला हवी. काल जे केले त्यातून आलेल्या अनुभवातून मी आज काय नवीन बदल करू शकतो, असा विचार ते करतात. स्वत:बरोबरच इतरांच्या अनुभवातून शिकण्याची ते तयारी ठेवतात. आपणही दररोज स्वत:च्या कामाचे मूल्यमापन करून आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवायला पाहिजे. तसेच जवळच्या लोकांनाही तुमच्यावर लक्ष ठेवण्याची विनंती करू शकता.४. चर्चा करातुम्हाला असणाऱ्या अडचणी, प्रश्न आपल्या इतर सहकारी (ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता) त्यांच्यासोबत शेअर करा. एकत्र येऊन एखाद्या विषयावर चर्चा केल्यामुळे सर्वांच्या दृष्टिकोनातून विविध पैलू समोर येतात. इतरांकडून मदत मागण्यात कमीपणा वाटू देऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्याला येईलच, माहीतच असेल असे नसते. त्यामुळे मित्र-परिवाराशी चर्चा करून समस्या दूर करा.५. विद्यार्थी बनून राहा‘आजन्म विद्यार्थी’ बनून राहण्याची सवय आपल्या प्रत्येकात असली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये असणाºया नवीन गोष्टी जाणून घेण्याचे कुतूहल आपल्याला अधिक संपन्न करत असते. मला सर्व काही येते अशा अविर्भावात कधीही राहू नये. यशस्वी लोक  ती चूक कधीच करत नाही. ते प्रश्न विचारतात, शोध घेतात, निरीक्षण करतात, सतत शिकण्याची वृत्ती बाळगतात. या पाच सवयी तुम्हीदेखील आत्मसात करा. फरक आपोआप दिसेल.