बराक ओबामांच्या ६ लेट नाईट सवयी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 5:40 PM
रष्ट्राध्यक्ष ओबामा रात्री उशिरा काय करतात, त्यांच्या लेट नाईट सवयी काय आहेत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना केवळ आपल्याच देशाची नाही तर जगभराची चिंता करावी लागते. मुक्त जगातील सर्वात शक्तीशाली पदावर बसणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. काटेरी मुखूट म्हणतात ना, तशी काहीशी अवस्था असते. मग अशा सुपरबिझी माणसाला स्वत:साठी वेळ तरी कसा मिळतो? मावळते रष्ट्राध्यक्ष ओबामा रात्री उशिराचा वेळ स्वत:साठी राखून ठेवतात. त्यावेळी ते काय करतात, त्यांच्या लेट नाईट सवयी काय आहेत याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली ही माहिती.१. रात्रपाळीचा माणूसओबामा रात्री उशिरापर्यंत आपल्या आॅफिसमध्ये बसून काम करत असतात. संशोधनातून असे दिसून आले की, तुम्ही जेव्हा थकलेला असता तेव्हा तुमची सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) सर्वाधिक सक्रीय असते.२. बदाम खाओ!रोज रात्री ओबामा सात खारट बदाम खातात. ना एक जास्त, ना एक कमी. यातून त्यांना ४३ कॅलरी, ४ ग्रॅम फॅट, १० मिलीग्रॅम सोडियम आणि १.५ ग्रॅम प्रोटिन मिळते.३. खेळ पाहणेरात्री उशिरा काम करताना ते टीव्हीवर नेहमी खेळाचे चॅनेल लावून ठेवतात. दुसऱ्याला पळताना आपल्याच हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, रक्तप्रवाह वाढतो जणूकाही आपण स्वत:च पळत आहोत. कादाचित यामुळेच ते खेळ पाहत असावेत. ४. केवळ पाच तास झोपते रात्री २ दोन वा. झोपून सकाळी ७ वा. उठतात. म्हणजे झोप केवळ पाच तासांची. परंतु नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार सहा तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे तल्लखपणा कमी होतो, स्मरणशक्तीची झीज होते (राष्ट्राध्यक्षासाठी दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या) आणि लैंगिक इच्छादेखील कमी होते (नो कॉमेंट!).५. डोकेबाजओबामा रात्री उशिरा त्यांच्या आयपॅडवर ‘वर्डस् वुईथ फ्रेंडस्’ नावाचा शब्दखेळ खेळतात. यामुळे मेंदूचा व्यायाम होतो. पुरेशा बे्रन अॅक्टिव्हिटीमुळे अल्झायमर्सपासून बचाव होऊ शकतो. ६. कॉफी न पिणेते शक्यतो कॉफी पिण्याचे टाळतात. कॉफीऐवजी ते पाणी पिण्यावर अधिक भर देतात. आता ही सवय जरी चांगली असली तरी कॉफीसुद्धा आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. प्रौढ व्यक्तीने दररोज ४०० मिग्रॅ (चार कप) कॉफी पिल्यास कॅन्सर आणि हृदयविकारांना आळा बसू शकतो.तर मग या आहेत बराक ओबामांच्या सहा लेट नाईट सवयी. काही अनुकरणीय तर काहींमध्ये त्यांनी सुधारणा कराव्या अशा. येत्या सहा महिन्यात त्यांचा राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. एका नावाजलेल्या ब्रिटिश वृत्त वेबसाईटने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जगभरात ओबामा आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.