शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

​मल्टिपल थीमने रंगले अमेझॉन फॅशन वीकचे स्टेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 6:43 AM

अमेझॉन फॅशन वीक हा वेगवेगळ्या थीम्सने परिपूर्ण होता. मिस्ट्रीकल फॉरेस्ट या हटके अशा थीममध्ये डिझायनर अंजु मोदी यांनी निसर्ग आणि कला यांची सांगड घातली आहे.

फॅशन इंडस्ट्री म्हटली की, वेगवेगळे डिझायनर्स आणि त्यांच्या भन्नाट डिझाईन्स आणि डिझाईन्सचे प्रदर्शन घडवणे म्हणजेच फॅशन शो. या इंडस्ट्रीमध्ये नेहमी वेगवेगळे फॅशन शो होत असतात. यामार्फत फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात. दिल्लीमध्ये नुकताच पार पडलेल्या अमेझॉन फॅशन वीकमध्ये आदित्य बिर्ला ग्रुपचे "लिवा क्रेम"”ने ऑटम-विंटर कलेक्शन सादर केले. या फॅशन शोचे "लिवा" हे स्वतः गोल्ड स्पॉन्सर असून लिवाच्या नैसर्गिक कापडापासून बनवलेल्या डिझाईन्स यावेळी सादर करण्यात आल्या. डिझायनर अंजू मोदी, ईशा अमीन, गौरव जय गुप्ता, निदा महमूद, श्रुती संचेती आणि वेन्डेल्ड रॉड्रिक्स यांनी या शो मध्ये आपले डिझाईन्स सादर केले.हा फॅशन शो वेगवेगळ्या थीम्सने परिपूर्ण होता. मिस्ट्रीकल फॉरेस्ट या हटके अशा थीममध्ये डिझायनर अंजु मोदी यांनी निसर्ग आणि कला यांची सांगड घातली आहे. आपल्या कानावर नेहमीच वेगवेगळ्या गूढकथा पडत असतात. या गूढकथांमध्ये आपण ज्याप्रक्रारे आपले भावविश्व रंगवत असतो. अशा भावविश्वाचे चित्रण त्यांच्या डिझाईनर्स मधून दिसत आहे. एक मुक्त आणि आजच्या युगात जगणारी स्त्री जी तिच्या आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणे पसंत करते. खास त्या महिलांसाठी काळजीपूर्वक तयार केलेले डिझाईन्स म्हणजे "अनटेमड डेसर्ट." या वेगळ्या थीमचे सादरीकरण इशा अमीनने केले.जुन्या जमान्यात मुलींच्या पेहरावात फुलांचे नक्षीकाम हे आपण पाहिले आहे. आताच्या फॅशनमध्ये हीच स्टाईल परत आणण्याचे काम निदा महमूद यांनी केले आहे. डोळ्यांना प्रसन्न वाटावे अशा रंगांसोबत पानाफुलांचे नक्षीकाम यांची उत्तम सांगड या कलेक्शनमध्ये सादर करण्यात आले. थंडीच्या मौसमात वेगवेगळ्या रंगांची फुले बहरतात, अगदी रस्त्यावरून जातानादेखील ही लहान लहान गुलाबी, पिवळ्या छटांची फुले दिसतात. डिझायनर श्रुती संचेती यांनी याच लहान पण आकर्षक फुलांची प्रेरणा घेऊन या वर्षीच्या फॅशन वीकमध्ये आपले कलेक्शन सादर केले.सफेद रंग हा सर्वांना मोहित करणारा रंग आहे. अमेझॉन फॅशन वीकमध्ये लिवाची डिझायनर वेन्डेन रॉड्रिक्स यांनी व्हाईट कार्पेट कलेक्शनमार्फत आपल्या कलेचे सादरीकरण केले. आदित्य बिर्ला ग्रुपचे लिवा हे फॅब्रिक नैसर्गिक फॅब्रिक आहे. या फॅब्रिकमधून निर्माण झालेले कपडे जसे की, कुर्ती, वेस्टर्न आउटफिट, साडी हे नेह्मीच आकर्षण ठरले आहेत. अमेझॉन फॅशन वीकमध्ये लिवामार्फत तयार झालेल्या कपड्यांच्या सादरीकरणामुळे लिवाने सर्वांचे लक्ष घेतले.