‘अॅपल’ने खरेदी केली भारतीयवंशाच्या स्वयंद्योजकांची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2016 9:58 AM
‘ग्लिम्प्स’ नावाची ही स्टार्ट-अप कंपनी अॅपलने खरेदी केली आहे.
अलिकडच्या काळात ‘अॅपल’ची डिजिटल आरोग्य क्षेत्रातील रुची खूप वाढली आहे. कंपनीने अनेक छोटे-मोठे हेल्थ केअर स्टार्ट-अप्स खरेदी केले आहेत. यामध्ये आता दोन भारतीयवंशाच्या स्वयंद्योजकांच्या कंपनीचादेखील सामावेश झाला आहे. ‘ग्लिम्प्स’ नावाची ही स्टार्ट-अप कंपनी अॅपलने खरेदी केली आहे.अनिल सेठी आणि कार्तिक हरिहरन या दोघांनी २०१३ मध्ये ‘ग्लिम्प्स’ची स्थापना केली होती. ‘ग्लिम्प्स’द्वारे यूजर्स आपली वैयक्तिक वैद्यकीय माहिती शेअर करू शकतात. ‘अॅपल’च्या प्रवक्त्याने म्हटले की, अॅपल वेळोवेळी अशा छोट्या तंत्रज्ञान कंपन्या खरेदी करत असते. परंतु यामागचा आमचा हेतू किंवा उद्देश काय याची माहिती आता देणे योग्य ठरणार नाही.अॅपलने आतापर्यंत ‘हेल्थकीट’, ‘केअरकीट’, ‘रिसर्चकीट’ अशा डिजिटल हेल्थ केअर स्टार्ट-अप कंपन्यांचे अधिग्रहन केले आहे. याद्वारे रुग्ण, डॉक्टर आणि संशोधकांना महत्त्वाच्या वैद्यकीय सेवा आणि माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येते. आयफोन-६ साठी कंपनीने हेल्थकीट अॅपदेखील विकसित केलेै. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येते. म्हणून तर अॅपलने या महिन्याच्या सुुरुवातील मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म ‘टुरी’ २०० मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले.