शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

मऊसूत केस आणि सुंदर त्वचेसाठी मेथीचा रस आणि लेप लावा.

By admin | Published: June 07, 2017 6:18 PM

सौंदर्याच्या संबंधित अनेक समस्यांवर मेथीची भाजी आणि मेथ्या या उत्तम औषधही आहेत.

- मृण्मयी पगारे.कडूसर चवीची मेथीची भाजी अनेकांना जेवणात रोज दिली तरी चालते. इतकी मेथीची भाजी प्रिय आहे. मेथीच्या भाजीनं तोंडाला चव येते. इतकंच कशाला मेथीचं बी म्हणजे मेथ्या त्याही अनेक पदार्थांना चव आणतात. ताकाच्या कढीत फोडणीला मेथ्यांचे दाणे घातल्यास वेगळीच चव येते. डिंकाच्या लाडूत मेथ्यांची पावडर मिसळल्यास लाडूची चव आणि गुणवत्ता दोन्हीही वाढते. तसेच या मेथ्या भिजत घालून त्यांना मोड आणून आंबट गोड आणि थोडीशी कडूसर चवीची उसळही छान लागते. पण मेथीची भाजी आणि मेथ्या या काही फक्त खाण्यापुरत्याच नसून त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहे. तसेच सौंदर्याच्या संबंधित अनेक समस्यांवर मेथीची भाजी आणि मेथ्या या उत्तम औषधही आहेत.मेथी आणि आरोग्य * मेथीचा उपयोग ताप उतरण्यासाठी होतो.* पोटाच्या तसेच श्वसनाच्या विकारातही मेथीचा उपयोग होतो. * मेथीमध्ये खनिजं आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच मेथी आणि मेथ्यांचा उपयोग खाण्यासोबतचं इतर अनेक कारणांसाठीही होतो. * अंगाला येणारी घामाची दुर्गंधी आणि मुखदुर्गंधी घालवण्यासाठी मेथीच्या पानाचा उपयोग खूपच फायदेशीर ठरतो. * मेथीच्या भाजीमुळे बाळांतिणीच्या दुधातही वाढ होते.

 

          मेथी आणि सौंदर्य* सौंदर्योपचारातही मेथी आणि मेथ्यांचा उपयोग होतो. विशेषत: केसांच्या समस्यांसाठी मेथीचा उपयोग केल्यास फायदा होतो.* कोरड्या आणि गळणाऱ्या केसांना मऊसूत करण्यासाठी एक कप मेथीची पानं आणि एक कप किसलेलं खोबरं घ्यावं. दोन्हीही एकत्र वाटून त्याचा रस काढावा. हा रस केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. पंधरा मिनिटा नंतर केस धुवावेत. * काळ्याभोर केसांसाठी एक कप ताजी मेथीची पानं आणि चार ते पाच गूसबेरी घ्याव्यात. दोन्हीही एकत्र वाटून त्याचा रस काढावा. आणि तो केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. रस लावल्यानंतर साधारणत: पाऊण तासानं केस धुवावेत.* नुसती मेथ्यांची पानं रगडून त्यांचा रस काढून केसांना लावला तरी केसांचा पोत सुधारतो. * केसांना सतत कलर केल्यामुळे केस निर्जीव आणि शुष्क होतात. यासाठी पाव कप मेथ्या रात्रभर भिजत घालाव्या. थोडं पाणी टाकून मेथ्या वाटाव्या. सुती कापड वापरून मेथ्यांचा रस गाळून घ्यावा. मेथ्यांचा रस केसांना मसाज करत लावावा. आणि साधारणत: पाऊण तासानं केस धुवावेत. यामुळे केस मऊसूत होण्यास मदत होते. * चेहऱ्यावरच्या मुरूम आणि पुटकुळ्यांसाठी पाव कप मेथीची पानं आणि पाव कप तुळशीची पानं घ्यावीत. दोन्ही एकत्र वाटून त्याची पेस्ट करावी. आणि ही पेस्ट चेहेऱ्याला लावावी. ही पेस्ट त्वचेला संसर्ग झालेल्या ठिकाणी लावल्यास त्यावरही फरक पडतो.