- मोहिनी घारपुरे-देशमुखटॉप्सची व्याख्या करायची झाल्यास ‘ आॅल सीझन फॅशन स्टेटमेण्ट’ अशी करता येईल. या टॉप्समध्ये सध्या अनेक प्रकार मिळ्तात. साध्या लूकपासून मॉर्डन-फॅशनेबल लूक कॅरी करायचा असेल तर टॉपशिवाय पर्याय नाही. एकाच प्रकारचे टॉप्स वापरून बोअर झाला असाल तर टॉप्सचे 10 पर्याय आहेत.. ट्राय तर करा!1. ट्यूब टॉपशोल्डरलेस, स्लीव्हलेस असलेले हे टॉप्स खूपच सेक्सी दिसतात. विशेषत: छातीलगत हे टॉप्स अत्यंत फिट असतात. एखाद्या ट्यूबप्रमाणे हे टॉप्स शरीराचा वरचा भाग कव्हर करतात म्हणून त्यांना ट्यूब टॉप्स असं म्हटलं जातं. कॉर्पोरेट लूक कॅरी करताना अनेकदा सूटच्या आतमध्ये एखादा ट्यूब टॉप घालून फॅशन केली जाते.
2. क्रॉप टॉप भरपूर प्रकारात उपलब्ध असलेल्या क्रॉप टॉप्सची खासियत म्हणजे हे टॉप्स पोटाच्या काही इंच वर एवढेच लांब असतात. त्यामुळे ज्यांचं पोट खरोखरीच स्लीम असेल अशांनी एखादातरी क्रॉप टॉप आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायलाच हवा.पार्टीसाठी, डेटवर जाताना हे टॉप्स आणि जीन्स एकदम सुंदर लुक देतील. 3. टँक टॉप स्लीव्हलेस आणि विविध प्रकारच्या शोल्डर स्ट्रॅप्स असलेले टॉप्स म्हणजे टँक टॉप्स. हे टॉप्स स्पोर्ट्सवेअर, अंडरगारमेण्ट किंवा कॅज्युअल्स आउटरवेअर म्हणून घालता येतात. यामध्येही अनेक प्रकार आहेत, मात्र विशेषत: स्पगेटी टँक टॉप्स, स्लीव्हलेस आणि हॉल्टर टँक टॉप्सची फार चलती आहे. 4. स्कूप नेक टॉप्स नॉर्मल लेव्हलपेक्षा जास्त खालीपर्यंत गळ्याच्या आकारात वेगळ्या कापडानं हायलाईट केलेले असते किंवा नेट वगैरे लावून अधिक आकर्षक केलेले असते. इनरवर स्कूप नेक डिझाईन केलेला असतो, तो पुढच्या किंवा मागच्या बाजूनंही असू शकतो. याचा लूक एकदम वेगळाच येतो हेच या टॉपचे विशेष. 5. बॅटविंग टॉप हल्ली या प्रकारच्या टॉप्सची खूप चलती आहे. वरच्या बाजूनं काहीसा ढगळ आणि हिप्सपर्यंत येता येता व्यवस्थित फिटींगचा असलेला हा टॉप त्याच्या नावाप्रमाणेच वटवाघूळासारख्या बाह्यांनी आकर्षक ठरतो. हॉट शिफॉन स्लीव्ह्स आणि बॅक पॅटर्नमुळे खूपच वेगळा लुक येतो.
6. फ्रॉक स्टाईल टॉप पारंपरिक आणि पाश्चात्य लुकचं मिश्रण म्हणजे हे फ्रॉक स्टाईल टॉप्स. या टॉप्सवर फ्रॉकप्रमाणेच प्रिण्ट्स असतात आणि एकंदरच त्याचा लुक फ्रॉक्स सारखा असतो. हे टॉप्स केप्रिझ, लेगिंग्स, जीन्स यापैकी कशावरही छानच दिसतात. 7. आॅफ शोल्डर टॉप आॅफ शोल्डरची तर हल्ली खूपच फॅशन आहे. एरवी ब्लाऊजमध्ये पहायला मिळणारी ही फॅशन टॉप्समध्येही खूपच सेक्सी लुक देते. ब्रॉड नेक्स आणि खांद्यावरून एका किंवा दोन्हीही बाजूनं काहीसे खाली उतरणारे हे टॉप्स एकदम फॅशनेबल लूक देतात.8. शीअर टॉप्स डिझायनर टॉप्स म्हणून प्रसिद्ध असलेले हे शीअर टॉप्स कॉटनचे असले तरीही त्यावर गळ्यापाशी, बाह्यांना आणि बेसला फुलाफुलांची नक्षी असलेल्या विविध रंगातल्या जाळीदार कापडानं बॉर्डर केलेली असते. 9. पाँचो टॉप्स विशेषत: हवेत गारवा आला की पाँचो टॉप्स घालायला सुरूवात होते. पॉलिस्टर मटेरिअलमधले हे टॉप्स कोणत्याही डिझाईन वा पॅटर्नशिवाय असतात. काहीशा स्थूल मुलींना हे टॉप्स छान दिसतात. क्रेझी लाईन्स आणि कर्व्ही नेक हीच काय ती या टॉप्सची विशेषता.. पण तरीही हे टॉप्स अत्यंत सुंदर दिसतात.
10. प्रिण्टेड टॉप्स तुम्ही खूप फॅशनेबल नसाल पण तरीही थोडंफार आधुनिक राहाणी तुम्हाला आवडत असेल तर बाजारात मिळणाऱ्या प्रिण्टेड टॉप्सचाही पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. हे टॉप्स छान दिसतात. मात्र काळजी एवढीच घ्या की तुमच्या अंगावर योग्य मापात बसेल असाच टॉप निवडा नाहीतर बरेचदा हे टॉप गबाळे दिसू शकतात.