ब्राझीलमध्ये आॅलिम्पिक टॉर्च चोरण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2016 9:04 AM
ब्राझीलमध्ये एका बहाद्दराने आॅलिम्पिक मशालच चोरण्याचा प्रयत्न केला.
कोण काय चोरेल याचा काही नेम नाही. आता हेच पाहा ना. ब्राझीलमध्ये एका बहाद्दराने आॅलिम्पिक मशालच चोरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्याला वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले. ब्राझीलमधील ग्वारुल्हॉस शहरात ही घटना घडली.मशाल घेऊन धावणाऱ्या व्यक्तीसोबत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा घेरा मोडून एक अज्ञात व्यक्ती मशाल चोरण्याचा प्रयत्न करताना केला. आॅलिम्पिक टॉच मिरवणूकीने ४० किमीचा टप्पा पूर्ण करत असताना शनिवरी हा प्रकार साओ पाऊलो राज्यात घडला. आॅलिम्पिक मशाल पुढचे काही दिवस साओ पाऊलोमध्येच राहणार असून त्यानंतर ती ब्राझीलची राजधानी आणि आॅलिम्पिक यजमान शहर रिओ-दी-जानेरिओ येथे ४ आॅगस्ट रोजी पोहचणार आहे.५ ते २१ आॅगस्ट दरम्यान आॅलिम्पिक स्पर्धा खेळविण्यात येणार असून त्यामध्ये २०६ देशांमधील खेळाडू सहभागी होणार आहे.रिओ आॅलिम्पिक २०१६ : फन फॅक्टस्