जसं प्रत्येक ऋतूनुसार आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आपल्या आउटफिट्सबाबतही काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. प्रत्येक सीझननुसार आपल्यासाठी काही फॅब्रिक्स बेस्ट असतात. तर काही फॅब्रिक्स काही ऋतूंमध्ये समस्यांचं कारण ठरतात. मान्सूनमध्ये असेच काही फॅब्रिक्स खरेदी करणं किंवा वेअर करणं समस्यांचं कारण ठरू शकतं. आज म्ही तुम्हाला अशाच काही फॅब्रिक्सबाबत सांगणार आहोत, जे शक्यतो पावाळ्यामध्ये वेअर करणं टाळणचं फायदेशीर ठरतं.
व्हेलवेट
व्हेलवेट डिफ्रंट लूक कॅरी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पण पावसाळ्यामध्ये हे कपडे वेअर करणं शक्यतो टाळणंचं फायदेशीर ठरतं. घामामुळे किंवा पावसाळ्यात भिजल्यानंतर व्हलवेट फार जड होतं. तसेच ते लवकर सुकतही नाही. कारण हे कापड लिक्विड फार लवकर शोषून घेतं.
लेदर
पाणी म्हणजे लेदरचा दुश्मनचं... असे कपडे ज्यांमध्ये लेदर असेल किंवा शूज पावसाळ्यामध्ये वेअर करणं कटाक्षाने टाळावं. कारण जर असे कपडे किंवा शूज तुम्ही वेअर केले तर यांवर पाणी पडेल आणि ते खराब होतील.
डेनिम
डेनिम जीन्स किंवा जॅकेट तसं पहायला गेलं तर फार कन्फर्टेबल असतात. परंतु मान्सूनमध्ये हे खरेदी करू नये. पाण्याने भिजल्यानंतर हे फॅब्रिक्स फार जड होतात. एवडचं नाही तर लवकर सुकतही नाहीत. ज्यामुळे चालणंही अवघड होतं. याऐवजी तुम्ही कॉटन पॅन्ट्स किंवा शॉर्ट्स खरेदी करू शकता.
सिल्क
तुम्हाला पावसाळ्यामध्ये एखाद्या लग्नसोहळ्याला हजेरी लावायची आहे का? त्यासाठी तुम्ही जर सिल्कची साडी, शर्ट किंवा पॅन्ट वेअर करण्याच्या विचारात असाल तर तुमचा विचार त्वरित बदला. कारण सिल्कच्या साड्यांवर पाण्याचे डाग तसेच राहतात आणि हे डाग काही केल्या जातचं नाहीत.