सफारीसाठी हत्तींचा वापर टाळा- नील नितिन मुकेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2016 4:38 AM
येत्या १२ आॅगस्टला जागतिक हत्ती दिवस असून पेटाने सुरु केलेल्या अभियानात नील नितिन मुकेश सहभागी होत सफारी साठी हत्तींचा वापर टाळा असे आवाहन केले आहे.
येत्या १२ आॅगस्टला जागतिक हत्ती दिवस असून पेटाने सुरु केलेल्या अभियानात नील नितिन मुकेश सहभागी होत सफारी साठी हत्तींचा वापर टाळा असे आवाहन केले आहे. पर्यटनाला गेल्यावर अनेकदा हत्तींवर स्वारी करायची अशी आखणी केलेली असते. या अभियानात नील सहभागी झाला असून स्वत:च्या डोळ्यांना पट्टा लावताना दिसत आहे. डोळ्यांवरचा पट्टा काढताना तो बोलतो, ‘हत्तींची सफारी करताना आपल्याला तर मजा येते, पण त्यांना त्याच्यासाठी बांधून ठेवले जाते आणि मारलेही जाते.’‘मलाही लहानपणी हत्तीची सफर पसंत होती. पण, हत्तीबरोबर किती वाईट वागले जातात ते मी पाहिले. ते खरंच फार दुखद होते. एकीकडे आपण हत्तीचे डोकं असणाऱ्या गणपतीची पूजा करतो तर दुसरीकडे त्याच प्राण्याला त्रास देतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून मी पेटाला सहकार्य करत आहे.’पेटाने नेपाळमध्ये हत्तींना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची तपासणी केली. ज्यातून त्यांच्यावर छळ केला जातो हे निदर्शनास आले. त्यांना नेपाळमध्ये प्रशिक्षण देऊन जयपूरमध्ये पर्यटकांच्या सफारीसाठी पाठवले जाते. दोन वर्षाच्या हत्तीच्या बाळाला आईपासून लांब केले जाते आणि झाडाला बांधले जाते.