BEAUTY TIPS : शेविंग करण्याअगोदर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होणार नुकसान !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 7:53 AM
सुंदर दिसण्यासाठी घाईने शेविंग करणे पुरेसे नाही. अशाने नुकसानही होऊ शकते, यामुळे शेविंग करतेवेळी नेहमी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
-Ravindra Moreसुंदर दिसण्यासाठी घाईने शेविंग करणे पुरेसे नाही. अशाने नुकसानही होऊ शकते, यामुळे शेविंग करतेवेळी नेहमी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी, चला जाणून घेऊया. * शेविंग करण्याअगोदर चेहऱ्याला चांगल्याप्रकारे स्वच्छ पाण्याने धुवा. अशाने जरी त्वचेला ब्लेड लागले तरी इंफेक्शन होत नाही. * दाढीला मुलायम बनविण्यासाठी फेसक्लोथला कोमट पाण्यात भिजवून ३० सेकंदापर्यंत दाढीवर लावून ठेवा. याने त्वचा व केस मुलायम बनतील. * शेविंग क्रीम घेऊन चेहऱ्यावर आणि गळ्यावर अपवार्ड सर्कुलर मोशनमध्ये चांगल्याप्रकारे लावा. क्लोज आणि आरामदायक शेविंगसाठी नव्या रेजरचा वापर करावा.* दाढीच्या वरील भागाच्या शेविंगसाठी दाढीच्या वरच्या भागापासून जॉ लाइनपर्यंत लांब स्ट्रॉक घ्या. * गळ्यावरील शेविंग करण्यासाठी गळ्याच्या खालच्या भागापासून वरच्या बाजूने शेविंग करावे. याने रेजर बर्न आणि इनग्रोन हेअरची समस्या उद्भवत नाही. * क्लोजर शेविंगसाठी आपण आपल्या हाताने त्वचेला मुलायम करु शकता. * प्रत्येक स्ट्रोकनंतर रेजरला धुणे विसरु नका, नाहीतर केसांमुळे ते जाम होऊ शकते. * मॉइस्चराइज शेविंगनंतर अल्कोहोलयुक्त आफ्टरशेवच्या ऐवजी अशा टोनरचा वापर करा, ज्यात विटॅमिन आणि ऐलोवेराचा अर्क असेल. शेविंग पूर्ण झाल्यानंतर मॉइस्चराइजर्सचा वापर करा.Also Read : पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण !