शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

‘असाधारण’ कर्मचारी व्हायचयं? मग या ७ गोष्टी तुमच्यामध्ये हव्याच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2016 4:40 PM

मोठे यश मिळवायचे असेल तर यापेक्षा आणखी पुढे जाऊन एक ‘असाधारण’ कर्मचारी होण्याची तुम्हाला गरज आहे.

आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात इतरांपेक्षा वेगळं आणि वरचढ होण्यासाठी सगळ्यांचीच धडपड चालू असते.  तुम्ही जर नोकरी करत असाल आणि प्रोमोशन किंवा पगारवाढीची अपेक्षा असेल तर केवळ चांगला परफॉरमन्स करून चालणार नाही. आहे त्यापेक्षा जास्त क्षमतेने तुम्हाला प्रदर्शन करावे लागेल.‘चांगला एम्लॉयी’ तो असतो ज्याच्यावर अवलंबून राहता येते, तो स्वयंप्रेरित, सक्रीय आणि मेहनती असतो, त्याच्यामध्ये नेतृत्वगुण असतात. अगदी कौशल्यपूर्ण असा आदर्श कर्मचारी त्याला म्हणता येईल असा.पण मोठे यश मिळवायचे असेल तर यापेक्षा आणखी पुढे जाऊन एक ‘असाधारण’ कर्मचारी होण्याची तुम्हाला गरज आहे. असे कर्मचारी केवळ त्यांच्या कामात पारांगतच नसतात तर ते इतरांचीदेखील कार्यक्षमता वाढवतात. टीममधील ते ‘एक्स-फॅक्टर’ असतात. असाधारण कर्मचाऱ्यांची वैशिष्ट्ये काय असतात तर ते-१. अपेक्षित कामापेक्षा जास्त मेहनत घेतातमी कंपनीत अमुक पदावर काम करतो, माझी तमुक जबाबदारी आहे त्यामुळे मी हे काम करू शकत नाही, असे ते कधीच म्हणत नाहीत. काम कशा प्रकारे पूर्ण होईल यासाठी ते जॉब डिस्क्रिप्शनच्या पलीकडे जाऊन मेहनत घेतात. आणि जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा ते कोणी सांगण्याच्या आधीच ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात.२. थोडेसे विक्षिप्त असतातएकदम हुशार लोकांचे वागणे पाहिले तर ते थोडसं विक्षिप्त वाटते. बऱ्याचदा आपल्याच तंद्रीमध्ये असतात. ते इतरांपेक्षा थोडं वेगळं वागतात (पण चांगल्या अर्थाने). त्यांच्या विक्षिप्तपणामुळे ते इतरांमध्ये उठून दिसतात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणतात. लोक वेडे म्हणू देत पण मी काही झाले तरी हे काम पूर्ण करीन अशी वृत्तीच त्यांना वरचढ ठरवते.३. त्यांना ‘मी’पणा कधी सोडायचा हे माहीत असतेते वागायला जरी विक्षिप्त वाटत असले तरी कोणत्यावेळी आपले वेगळेपण बाजूला ठेवून टीम सदस्यांमध्ये मिसळून जाण्याचे असाधारण कौशल्य त्यांच्यामध्ये असते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते चटकन स्वत:च्या वागण्यात योग्य तो बदल करतात. स्वत:चे वेगळेपण आणि सांघिक भावना बाळगणे या दोहोंचा मेळ बसवणे तसे अवघडच असते. म्हणूनच तर त्यांना ‘असाधारण’ म्हणतात.४. सर्वांसमोर सहकाऱ्यांची स्तुती करतातवरिष्ठांनी स्तुती केलेली कोणाला नाही आवडणार? परंतु आपल्याच सहकाऱ्यांच्या तोंडून चार कौतुकाचे शब्द ऐकणे किती मोठी बाब आहेश, हे आॅफिस पॉलिटिक्स जाणणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. असाधारण कर्मचारी केवळ सहकाऱ्यांची प्रशंसाच नाही तर सर्वांसमोर त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढतात. यामुळे सहकार्याची भावना वाढते.५. मतभेद खाजगीमध्ये सांगतातआपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत आपण सहमत असूच असे नाही. परंतु आपले आक्षेप किंवा मतभेद सर्वांसमक्ष व्यक्त करण्याऐवजी ते खाजगीमध्ये सांगतात. म्हणजे मीटिंगच्या आधी किंवा नंतर एकट्यामध्ये सहकाऱ्याशी एकांतात बोलून दाखवतात. जेणेकरून दोघांमधील वाद किंवा मतभेद आॅफिसमध्ये गॉसिप बनणार नाही याची ते पुरेपुर काळजी घेतात.६. निडरपणे प्रश्न विचारतातबरेच कर्मचारी असे असतात जे मीटिंगीमध्ये उघडपणे बोलण्यास कचरतात. त्यांच्या मनातील प्रश्न बिनदिक्कतपणे मांडत नाहीत. असाधारण कर्मचारी मात्र निडरपणे प्रश्न विचारतात. न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर चर्चा घडवून आणतात. ज्यामुळे आॅफिसमध्ये अधिक पारदर्शकता येऊन सर्वांच्याच मनावरचा शंकाकुशंकाचा ताण निवळतो.७. त्यांना सतत नाविन्यतेचा ध्यास असतोcnxoldfiles/span> पूर्ण करत नाही तर रोजच्या कामातसुद्धा नाविन्यता आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. सहजासहजी ते समाधानी होत नाहीत. चांगले कर्मचारी नेमून दिलेल्या कामाला ठरवून दिलेल्या पद्धतीने पूर्णत्वास नेतात; पण असाधारण एम्लॉयी स्वत:ची स्टाईल विकसित करतात. त्यांची ही अंगभूत खासियत असते.