(Image Credit: www.mirror.co.uk)
आजच्या जमान्यात बिकीनी परिधान करणे ही एक सामान्य आणि फॅशनची बाब झाली आहे. सर्वसामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी कधी ना कधी आपल्याला बिकीनी परिधान केलेल्या बघायला मिळतात. पण ही बिकीनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली हे अनेकांना माहीत नसेल. आज बिकीनी डे निमित्त बिकीनीचा इतिहास जाणून घेणार आहोत.
बिकीनी कुणी केली तयार?
फ्रेंचचे ऑटोमोबाईल इंजिनिअर आणि कपड्यांचे डिझायनर Louis Reard यांनी सर्वात पहिल्यांदा बिकीनी तयार केली होती. ही बिकीनी 5 जुलै 1946 मध्ये Micheline Bernardini लावाच्या मॉडेलने परिधान करुन सार्वजनिक केली होती. बिकीनीचं नाव हे bikni atoll या जागेच्या नावावरुन घेण्यात आलं होतं. याच जागेवर अणुबॉम्बची चाचणी होत होती.
फ्रान्समध्ये विरोध
फ्रेंच महिलांना बिकीनी चांगलीच पसंत पडली होती. पण तेथील चर्चना याचं डिझाइन फार आपत्तीजनक वाटलं होतं. इतकेच नाहीतर तेथील मीडियानेही बिकीनीच्या डिझाइनला विरोध केला होता.
ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये बिकीनीचा जलवा
1951 मध्ये पहिल्यांदा मिस वर्ल्डच्या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये बिकीनी परिधान करण्यात आली होती. पण त्यानंतर या कॉन्टेस्टमध्ये बिकीनी परिधान करण्यावर बॅन करण्यात आला होता.
बिकीनीची वाढती लोकप्रियता
अभिनेत्री Bridget Bardot ने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षिक तेव्हा 1953 मध्ये तिने कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बिकीनी परिधान केली होती. त्यानंतर अनेक अभिनेत्री बिकीनीमध्ये दिसू लागल्या. तेच 1960 मध्ये playboy आणि sports illustrated नावाच्या मॅगझिनने बिकीनीचं डिझाइन आपल्या कव्हर पेजवर छापलं होतं.
असा होत गेला बदल
18व्या दशकात पहिल्यांदा बेदिंह सूटचं चलन वाढलं होतं. पूर्ण शरीर झाकण्यासाठी बेदिंह सूट उलन आणि कापसाचा तयार करण्यात येत होता. जाड फॅब्रिकमुळे हा सूट धुतल्यानंतर सुकण्यासाठी फार वेळ घेत होता. 20व्या शतकात पर्यटनाचा विकास होऊ लागला आणि बेदिंग सूटमध्ये बदल झाला. आता यात इलास्टिकचा वापर होऊ लागला.
19020 दरम्यान स्विमसूटने फार मॉडर्न लूक धारण केला होता. त्यावर वेगवेगळे डिझाइन दिसू लागले होते. आज बिकीनी फॅशन म्हणून सगळेच वापरतात. बॉलिवूड सिनेमांमध्ये तर याचा अधिक वापर होतो.