Birthday Special : महेंद्र सिंह धोनीचे ‘हे’ रेकॉर्ड्स मोडणे अशक्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2017 9:27 AM
धोनीने आजपर्यंतच्या १३ वर्षात असे काही रेकॉर्ड्स बनविले जे आजपर्यंत कोणत्याच भारतीय क्रिकेटरला जमले नाही.
-Ravindra Moreभारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज ३६ वर्षाचा झाला. ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये झाला. धोनीने २३ डिसेंबर, २००४ रोजी क्रिकेट विश्वात पदार्पण केले. धोनीने आजपर्यंतच्या १३ वर्षात असे काही रेकॉर्ड्स बनविले जे आजपर्यंत कोणत्याच भारतीय क्रिकेटरला जमले नाही. धोनीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्या रेकॉड्सच्या बाबतीत... * कमालीचा विकेटकीपर धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वश्रेष्ट विकेटकीपर आहे. धोनी असा पहिला भारतीय विकेटकीपर आहे ज्याच्या नावे ७३४ बळी ( ५७६ कॅच, १५८ स्टंपिंग्स) आहेत. धोनीच्या पुढे फक्त एडम गिलक्रिस्ट (९०५) आणि मार्क बाउचर (९९८)च आहेत. * सर्वात जास्त धावसंख्या बनविणारा भारतीय विकेटकीपर धोनी सर्वात जास्त धावसंख्या बनविणारा भारतीय विकेटकीपर ठरला असून धोनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये १५ हजार ५८१ धावा केल्या आहेत. * सर्वश्रेष्ट व्यक्तिगत स्कोर धोनीने आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या विरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. वनडे मध्ये कोणत्याच विकेटकीपर-फलंदाजद्वारा एवढी धावसंख्या झालेली नाही. दुसऱ्या नंबरवर एडम गिलक्रिस्टची धावसंख्या १७२ ची आहे. * सर्वात जास्त षटकार लावणारा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकुण ३२२ षटकार लावून धोनी या यादीत दुसऱ्या भारतीय फलंदाजांपेक्षा खूपच पुढे आहे. * सर्वात यशस्वी कर्णधार धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये भारताने ११० वनडे आणि २७ टेस्ट मॅच जिंकले आहेत. दुसऱ्या नंबरवर सौरव गांगुली आहे, ज्याच्या कॅप्टनशिपमध्ये ७६ वनडे आणि २१ टेस्ट मॅच भारताने जिंकले आहेत. * सर्व आयसीसी टूर्नामेंट जिंकणारा एकमेव कर्णधार भारताने धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये ५०-५० ओव्हराचा वर्ल्ड कप, टी२० वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफी जिंकली आहे. असा विक्रम करणारा धोनी हा जगात एकमेव कर्णधार आहे. * टेस्टमध्ये सर्वोच्च स्कोर आॅस्ट्रेलियाच्या विरोधात टेस्ट मॅचमध्ये २२४ धावा करणारा धोनी एकमेव असा भारतीय विकेटकीपर-फलंदाज आहे.* सर्वात जास्त षटकार लावणारा कर्णधार धोनीने आपल्या कॅप्टनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त षटकार लावले आहेत.या यादीत धोनी नंतर आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पोंटिंगने १७१ षटकार आणि न्यूजिलँडचे ब्रैंडन मॅक्कुलमने १७० षटकार लावले आहेत. Source : aajtak