मयूर पठाडेडोळे निसर्गत:च सुंदर, टपोरे आणि पाणीदार असतील तर ठीक, पण ते खरोखरच सुंदर राहण्यासाठी, किमान डोळ्यांना कायमच चांगलं दिसावं यासाठी आपण काय करतो? - बहुदा काहीच नाही. जेव्हा दृष्टी कमी कमी व्हायला लगते, डोळे दुखायला लागतात किंवा चष्मा लागायची वेळ येते त्याचवेळेस आपल्याला जाग येते.खरंतर डोळ्यांच्या सौंदर्यासाठी आणि आपली दृष्टी चांगली राहण्यासाठी घरच्याघरीही अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. खरं तर यासाठी आपल्याला करायचंही काहीच नाहीए. आपल्या आहारात काही गोष्टी मात्र आपल्याला नियमितपणे घ्याव्या लागतील.डोळ्यांसाठी गाजरं चांगली असतात हे आता सगळ्यांनाच माहीत आहे, पण आणखीही अशी अनेक फळं आणि खाद्यपदार्थ आहेत, जी तुम्ही नियमितपणे खाल्लीत तर तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य आणखीच वाढेल.डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी काय खाल?
१- हिरवागार पालक, ब्रोकोली, कोबी, सलाड.. यासारख्या पदार्थांमध्ये अॅँटीआॅक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असतं. याशिवाय तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठीही त्यांचा खूप उपयोग होतो. हे पदार्थ खाल्ल्यामुळे मोतीबिंदूची शक्यताही खूपच कमी होते. २- अंड्यांत जो पिवळा बलक असतो, तोही डोळ्यांसाठी खूपच चांगला मानला जातो. डोळ्यांची दृष्टी खालावण्यापासून याची मदत होते. ३- आंबटसर चवीची जी फळं आहेत, ती नियमितपणे खाल्ल्यानंही डोळ्यांची चमक कायम राहते आणि दृष्टी टिकून राहण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. द्राक्षं, लिंबू, संत्री.. यासारखी फळं डोळ्यांच्या सौंदर्यासाठी उपयुक्त सिद्ध झाली आहेत. यामध्ये असलेल्या सी जीवनसत्त्वामुळे मोतीबिंदूची शक्यताही नगण्य होते.
४- रोज तुम्ही नियमितपणे सातआठ बदाम खात असाल तर त्यानंही डोळ्यांचं तेज वाढण्यासाठी मदत होते. ५- आपल्या डोळ्यांचं साौंदर्य आहे त्यापेक्षा आणखी खुलवायचं असेल, तर मांसाहार करणाऱ्यांपैकी ज्यांना मासे आवडतात, त्यांनाही त्याचा फार उपयोग होऊ शकतो. यातील फॅटी अॅसिड डोळ्यांचं संरक्षण तर करतंच, पण आपली दृष्टीही तेज राखतं.६- याशिवाय मकाही डोळ्यांसाठी चांगला समजला जातो.हे सारे पदार्थ रोज खा, असं नाही, पण काहीही न करता, आपलं आरोग्यही चांगलं राखलं जात असेल आणि डोळ्यांचं सौंदर्यही वाढत असेल, तर हे उपाय करून पाहायलाच हवेत.